भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील T२० मालिका सुरु झाली आहे. ५ सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर खेळला जात आहे. स्फोटक फलंदाजी करताना भारतीय संघाने पहिल्या डावात २११ धावा केल्या. तत्पूर्वी, पाहुण्या संघाचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.(India, South Africa, Feroze Shah Kotla Maidan, Hardik Pandya)
IPL २०२२ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने आयपीएल विजेतेपद जिंकले होते. हार्दिकने आपल्या कर्णधारपदासह फलंदाजी आणि गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. या सामन्यात भारतीय कर्णधार ऋषभ पंतने ५व्या षटकात हार्दिक पांड्याकडे गोलंदाजी दिली. त्याच्यासमोर ड्वेन प्रिटोरियस होता, जो तिसऱ्या क्रमांकावर खेळपट्टीवर हिटर म्हणून पाठवला होता.
पहिल्या चेंडूवर त्याने बॅट स्विंग केली पण चेंडू थेट विकेटकीपरच्या हातात गेला. दुसरा चेंडू लेग स्टंपच्या दिशेने होता आणि प्रॅटोरियसने षटकार ठोकला. ओवरच्या तिसऱ्या चेंडूवर हार्दिक पंड्याने एक शॉर्ट टाकला आणि प्रिटोरियसने षटकार खेचून मिड-विकेटवर पाठवत षटकार ठोकला. चौथ्या चेंडूवर फलंदाजाने पुन्हा बॅट फिरवली, पण चेंडू बॅटला लागला नाही.
हार्दिकने ५ वा चेंडू संथ गतीने टाकला आणि प्रिटोरियसने तो डीप स्क्वेअर लेगच्या सीमारेषेबाहेर पाठवला. हार्दिकने शेवटच्या चेंडूवर एकही धाव दिली नाही पण या सामन्यातील दोन्ही डाव एकत्र करून पॉवरप्लेचे हे सर्वात अनपेक्षित ओवर ठरले. हार्दिकने टाकलेल्या या ओवरने सर्वांनाच धक्का दिला.
तत्पूर्वी, इशान किशनने ४८ चेंडूत ७६ धावा करत भारताला ४ बाद २११ पर्यंत नेले. इशानने आपल्या खेळीत ११ चौकार आणि तीन षटकार मारले. श्रेयस अय्यरने ३६ आणि केएल राहुलच्या दुखापतीमुळे प्रथमच भारताचे कर्णधारपद भूषवणाऱ्या ऋषभ पंतने २९ धावा केल्या. हार्दिक पांड्याच्या बॅटने १२ चेंडूत ३१ धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या-
लिलावात अनसोल्ड राहिला होता हा खेळाडू, हार्दिक पांड्याने दाखवला विश्वास अन् गाजवले मैदान
दिनेश कार्तिकसोबत हार्दिक पांड्याने निभावली मैत्री, स्वता कार्तिकने केले कौतुक, म्हणाला
ट्रॉफी जिंकताच हार्दिक पांड्याचं घरी झालं जंगी स्वागत, भाऊ क्रुणालने अशी केली होती तयारी
VIDEO: कोच आशिष नेहरा हार्दिक पांड्याला म्हणाला खोटारडा, जाणून घ्या मुलाखतीदरम्यान काय घडलं?