Share

एकदा पैसे गुंतवा आणि आयुष्यभर तुफान कमाई करा; जाणुन घ्या एलआयसीची नवीन योजना

देशातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह जीवन विमा कंपनी म्हणजेच तुमची आमची एलआयसी (LIC). एलआयसी नेहमीच आपल्यासाठी वेगवेगळ्या योजना आणत असते. आणि एलआयसी सरकारद्वारे संचालित झाल्यामुळे येथे तुमची गुंतवणूक पुर्णपणे सुरक्षित आहे हे तर आपल्याला माहितच आहे. एलआयसी आपल्या फायद्यासाठी आणि भविष्य उज्वल करण्यासाठी नेहमीच सक्रिय असते.

आता ही आपले भविष्य उज्वल करण्यासाठी एलआयसीने नविन योजना आणली आहे. त्या योजनेचे नाव आहे ‘जीवन अक्षय’. या योजनेत तुम्ही एकदाच पैसे गुंतवून आयुष्यभर कमाई करू शकता. ज्या लोकांना वृद्धापकाळात पेन्शनची चिंता आहे, त्यांच्यासाठी ही योजना अतिशय उपयुक्त आहे. या योजनेत तुम्ही १० वेगवेगळे पर्याय निवडू शकतो. आवश्यकतेनुसार हे पर्याय निवडता येतील.

यापैकी एक ‘Annuity Payable for life at a uniform rate’ (दरमहा पेन्शन पर्याय) हा देखील आहे. ही योजना २५ ऑगस्ट २००० पासून सुरू झाली आहे. हा प्लॅन ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने खरेदी केला जाऊ शकतो. तसेच ही योजना वयासाठी ३० वर्षे ते ८५ वर्षांपर्यंत उपलब्ध आहे. वेगवेगळ्या सक्षम (अपंग अवलंबितांना) फायदा मिळवून देण्यासाठी ही योजना देखील खरेदी करता येईल.

जीवन अक्षय पॉलिसी तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहा महिन्यांसाठी किंवा एका वर्षाच्या अ‍ॅन्यूटी मोडमध्ये खरेदी करू शकता. यामध्ये ग्राहकांना कमीतकमी १२ हजार अ‍ॅन्यूटी मिळू शकते. तसेच ही पॉलिसी जारी झाल्यानंतर तीन महिन्यांनंतर कर्जाची सुविधादेखील उपलब्ध आहे. म्हणजेच पॉलिसीधारक देखील कर्ज घेण्यास सक्षम असतील.

या पॉलिसीमध्ये तुम्ही कमीतकमी १ लाख रुपये गुंतवू शकता. तर जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी कोणती मर्यादा नाही आहे. जर तुम्ही या पॉलिसीमध्ये एकरकमी ५०७२००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल तेव्हा तुमच्या खात्यात १९ हजार रुपये महिना पेन्शन येईल.

या पॉलिसीमध्ये, एकाच कुटुंबातील दोन लोक, एकाच कुटुंबातील वंशज (आजी आजोबा, आई-वडील, मुले, नातवंडे), जोडीदार किंवा भावंड यांच्यात संयुक्त जीवन ॲन्युइटी घेता येते. पॉलिसी जारी झाल्यानंतर तीन महिन्यांनंतर किंवा फ्री-लुक कालावधी संपल्यानंतर कर्जाची सुविधा कधीही उपलब्ध असेल.

महत्वाच्या बातम्या
सनी देओलचे करिअर फ्लॉप करायला निघालेले महेश भट्ट स्वतःचे करोडोचे नुकसान करून बसले
शेतकऱ्याचा नाद नाय! एक गुंठ्याची शेती नेली ८ एकरावर, सालगडी म्हणून काम करणारा बनला करोडपती
bharatpe controversy: अशनीर ग्रोवर यांच्या बायकोने दारू पार्टीचा व्हिडीओ केला शेअर, केले गंभीर आरोप
VIDEO: ‘जो राम को लाएंगे हम उनको लाएंगे’, भाजपला उघडपणे पाठिंबा देणाऱ्या पोलिसावर कारवाई

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now