दिनेशने 2007 मध्ये पत्नी निकितासोबत लग्न केले. दोघांचे वडील जिगरी मित्र होते आणि त्यांच्या वतीने हा विवाह लावण्यात आला होता. 2012 मध्ये जेव्हा दिनेश विजय हजारे ट्रॉफी सामना खेळत होता तेव्हा त्याला त्याची पत्नी आणि मित्र क्रिकेटर मुरली विजय यांच्या अफेअरबद्दल माहिती मिळाली.
हा झटका सहन करणे दिनेश कार्तिकसाठी सोपे नव्हते. एक म्हणजे पत्नीचा विश्वासघात आणि दुसरा म्हणजे मित्राचा विश्वासघात. दिनेशचा पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाला. काही काळानंतर निकिता प्रेग्नंट असल्याचेही समोर आले आणि त्यानंतर तिने मुरली विजयसोबत लग्न करून आपले नवीन जीवन सुरू केले.
दिनेश ज्या टप्प्यातून जात होता त्या टप्प्यातून कोणालाही जावेसे वाटणार नाही. कोणी स्वप्नातही विचार केला नसेल त्या टप्प्यातून दिनेश जात होता. पण दिनेशने ज्या प्रकारे हे प्रकरण हाताळले ते सर्वांसाठी एक उत्तम उदाहरण आहे. यानंतरही दिनेश कार्तिकने कधीही आपल्या पहिल्या पत्नीचे नाव सार्वजनिक ठिकाणी घेतले नाही किंवा तिचाअपमान केला नाही किंवा तिच्याबद्दल कोणतेही वक्तव्य केले नाही. ते फक्त शांतपणे वेगळे झाले.
सर्व काही सहन करूनही त्यांनी कोणाचीही बदनामी केली नाही हे यावरून ते किती सज्जन आहेत हे दिसून येते. असे कोणाच्याही बाबतीत घडले तर साहजिकच तो माणूस ओरडून सर्वांना सांगतो की त्याच्यासोबत काय घडले आणि आपली कशी फसवणूक झाली, पण या संपूर्ण प्रकरणात दिनेश कार्तिकने मौन बाळगल्याने सर्वांना एक धडा शिकायला मिळाला की, जोडप्यांनी कधीही आपल्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित कोणतीही बाब असू द्या, ती कितीही मोठी असली तरी सार्वजनिक ठिकाणी उघड करू नये.
दिनेश कार्तिकच्या करिअरमध्ये असा एक काळ होता जेव्हा त्याला टीम इंडियामध्ये जागा मिळत नव्हती. २००४ मध्ये दिनेशने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पन केले होते. सुरूवातीच्या काळातच दिनेशने आपल्या फलंदाजीने आणि किपरींगने सगळ्यांना प्रभावित केलं होतं. पण एकदा त्याच्या करिअरला ब्रेक लागला होता. टीम इंडियात धोनीचे आगमन झाले होते. धोनी फॉर्ममध्ये असल्यामुळे दिनेश कार्तिक मागे पडला.
गेल्या १८ वर्षात त्याला टीम इंडियामध्ये म्हणेल तशी जागा मिळाली नाही. या १८ वर्षात दिनेशने २६ टेस्ट, ९४ वनडे आणि ३२ टी-२० इंटरनॅशनल मॅचेस खेळल्या आहेत. धोनीसारखा खेळाडू टीममध्ये असल्यामुळे त्याला इतकी वर्ष स्ट्रगल करावे लागले. सध्या दिनेश कार्तिक आरसीबीसाठी सगळ्यात मोठा मॅच विनर ठरला आहे. आरसीबीला जर यावर्षी विजेतेपद जिंकायचे असेल तर दिनेश कार्तिकचा हा फॉर्म कायम राहणे महत्वाचे आहे.
महत्वाच्या बातम्या
पहिल्या ऑडिशनमध्ये असा होता रणवीर सिंगचा स्वॅग, व्हिडिओ पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू
संजय राऊतांनी ईडीचे केले समर्थन, ‘तो’ जुना व्हिडीओ दाखवत भाजप नेत्याने केली पोलखोल
जेव्हा सलमान खानने आपल्या बालपणीच्या प्रेमाबद्दल केला खुलासा, म्हणाला, जर तिच्याशी लग्न केले असते तर..
”विराट कोहली, बाबर आझम आणि नऊ लाकडाचे तुकडे द्या, याच्यातच वर्ल्ड कप जिंकून दाखवेन”