Share

कशाची महागाई आली हो? सदाभाऊ खोतांनी केलं दरवाढीचं समर्थन, म्हणाले…

sdabhau khota

अलीकडे सातत्याने होणाऱ्या महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होतं आहे. केंद्र सरकारने इंधन दरवाढ, खाद्य तेल, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी दरवाढ केली आहे. जीवनावश्यक गॅस सिलिंडरचे दर १०१९ रुपयावर गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

तर दुसरीकडे या महागाईच्या निषेर्धात राज्यात, देशात अनेक ठिकाणी निदर्षणे करण्यात येत आहे. अशातच भाजपचे नेते सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी उघडपणे महागाईचं समर्थन केलं आहे. खोत यांचे वक्तव्य ऐकून अनेकांनी भुवया उंचवल्या आहे. तर वाचा काय म्हणाले खोत..?

‘कशाची महागाई आली हो, 20 हजाराचे सोनं 50 हजार तोळ झालं तरी लोक घेतात ना?’ असा उलट सवाल करत सदाभाऊंनी महागाईचं समर्थन केलं. तर दुसरीकडे या विधानामुळे सोशल मीडियात खोत यांना मोठ्या प्रमाणत ट्रोल करण्यात येत आहे. एकीकडे महागाईने नागरिक त्रस्त असताना खोत यांनी केलेल विधान ऐकून आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.

शेतकऱ्यांच्या समस्या, अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदाभाऊंचा राज्यव्यापी दौरा सुरू असून ते आज जळगावात पोहोचली. खोत यांनी जागर शेतकऱ्यांचा आणि आक्रोश महाराष्ट्राचा नावाने यात्रा सुरू केली आहे. आज खोत यांनी चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना खोत म्हणाले, ‘कशाची महागाई आली हो, 20 हजाराचे सोनं 50 हजार तोळा झालं तरी लोक घेतात ना? तेव्हा महागाई दिसत नाही, देशी क्वार्टर आता 150 ते 200 रुपयांना मिळायला लागली आहे. मग, महागाई नाही वाढली का? महागाई झाली तरी लोकं दारू पिणं सोडता का? असे सवाल खोत यांनी उपस्थित केले.

याचबरोबर ‘150 रुपयांची क्वार्टर तुम्ही पिऊ शकता मग आमच्या गायीचं दूध 100 रुपयांने का पिऊ शकत नाही. दारू 80 टक्के लोक पितात, पैशावाले सगळे दारू पितात, असेही खोत यांनी म्हटले. ग्रामस्थांशी बोलताना खोत यांनी स्पष्टपणे बोलत वाढत्या महागाईचे समर्थन केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
देशातील शाळांना मुलांना ‘पृथ्वीराज’ चित्रपट दाखवणं सक्तीचं करावं; अक्षयने सरकारकडे केली अजब मागणी
अयोध्येत लता मंगेशकर यांच्या नावाने बांधणार चौक; मुख्यमंत्री योगींनी केली मोठी घोषणा
राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या भाजप खासदाराला महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा पाठिंबा; फोन केला अन्…
‘हा’ गोलंदाज पुढील 10 वर्षे मुंबई इंडियन्सकडून खेळणार, हरभजन सिंगची मोठी भविष्यवाणी

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now