भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे आणि आशियातील दुसरे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. भारतात एकूण ८३३८ रेल्वे स्थानके आहेत, जी जाळ्यासारखी देशभर पसरलेली आहेत. पण कदाचित तुम्हाला एक गोष्ट माहित नसेल की देशात असे एक रेल्वे स्टेशन आहे, जिथे तुम्हाला फ्लाइटप्रमाणे व्हिसा आणि पासपोर्टची गरज आहे. (indias atari station dont allow without visa)
तसेच जर कोणी चुकून व्हिसाशिवाय या स्टेशनवर गेला तर त्याला तुरुंगात जावे लागू शकते. या रेल्वे स्टेशनचे नाव अटारी आहे, परंतु आता ते अटारी श्याम सिंह स्टेशन म्हणून ओळखले जाते. या स्टेशनला भेट देण्यासाठी पाकिस्तानी व्हिसा आवश्यक करण्यात आला आहे.
हे स्टेशन २४ तास गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांनी वेढलेले असते आणि येथे येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडे व्हिसा असणे अत्यंत आवश्यक असते, जर कोणीही व्यक्ती व्हिसाशिवाय या रेल्वे स्थानकावर पोहोचली तर त्या नागरिकावर गुन्हा दाखल होऊ शकतो.
व्हिसाशिवाय या रेल्वे स्थानकावर आल्याच्या आरोपाखाली काही लोकांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात जामीन मिळणेही अवघड असल्याने हा गुन्हा करणाऱ्याला तुरुंगात जावे लागू शकते. देशातील सर्वात व्हीव्हीआयपी ट्रेन ‘समझौता एक्सप्रेस’ या रेल्वे स्थानकावरून रवाना होत होती. पण काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यापासून समझौता एक्सप्रेस बंद आहे.
हे भारतातील पहिले रेल्वे स्थानक आहे जिथे रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी सीमाशुल्क विभागासह ट्रेनमध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांकडून परवानगी घेतली जाते. या रेल्वे स्थानकावरून तिकीट खरेदी करणाऱ्या सर्व प्रवाशांचा पासपोर्ट क्रमांक लिहिला जातो, त्यानंतर त्यांना कन्फर्म सीट दिली जाते.
पंजाबमधील भारतातील शेवटचे रेल्वे स्टेशन ‘अटारी’ आहे. या स्टेशनच्या एका बाजूला भारताचे अमृतसर आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचे लाहोर आहे. या रेल्वे स्थानकाचा इतिहास खूप मोठा आहे, समझौता एक्स्प्रेस बंद झाल्यानंतरही येथे काम सुरू असून आजही येथे लोकांना येऊ दिले जात नाही.
महत्वाच्या बातम्या-
मनसे मेळाव्यानंतर प्राजक्ता माळीची फेसबुक पोस्ट तुफान व्हायरल; “कोणत्याही राजकीय पक्षात…”
‘ही’ कार म्हणजे छोटा पँकेट बडा धमाका! फक्त एका लीटर पेट्रोलमध्ये धावते 42 किमी; गिनिज बुक मध्येही नोंद
पहाटेच्या शपथविधीवर राज ठाकरे कडाडले, पण देवेंद्र फडणवीसांनी ‘यासाठी’ केलं कौतुक, म्हणाले…