indian team top on points table | टी २० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकला आहे. भारताने हा सामना ५ धावांनी जिंकला आहे. त्यामुळे भारतीय संघाचे सेमी फायनलमधील स्थान पक्के केले आहे. हा सामना खुपच थरारक होता. पण शेवटच्या षटकात अर्शदीप सिंगने चांगली गोलंदाजी केल्यामुळे भारतीय संघाला हा सामना जिंकता आला आहे.
या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकला होता. त्यामुळे भारतीय संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरला होता. या सामन्यात केएल राहूलने ५० धावांची खेळी केली आहे. तर विराट कोहलीने ६४ धावांची खेळी केली होती. त्यामुळे भारतीय संघाला १८४ धावांचा मोठा स्कोर करता आला होता.
त्यामुळे बांगलादेशला १८५ धावांचे लक्ष्य मिळाले, जे सामन्यात पावसामुळे १६ षटकात १५१ धावा असे झाले. लिटन दासच्या स्फोटक सुरुवातीशिवाय एकाही फलंदाजाला प्रभावी खेळी करता आली नाही, त्यामुळे बांगलादेश फक्त १४५ धावाच करता आल्या आणि भारतीय संघाने हा सामना ५ धावांनी जिंकला.
हा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघासाठी आणखी एक आनंदाची बामती आली आहे. हा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ पुन्हा एकदा पॉईंट्स टेबलमध्ये टॉपवर पोहचला आहे. बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा संघ यादीत टॉपवर होता. पण आता भारताने तीन विजय मिळवल्यामुळे भारत यादीत टॉपवर आला आहे.
भारताचे आता ६ गुण झाले आहे. यामुळे भारतीय संघाने सेमीफानयलच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आता शुक्रवारी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सामना होणार आहे. तो सामना जर दक्षिण आफ्रिकेने जिंकला तर तो संघ थेट सेमी फायनलला जाईल.
दरम्यान, भारत-बांगलादेशच्या सामन्यात खुप थरार पाहायला मिळाला होता. बांगलादेशचे फलंदाज आक्रमकपणे फलंदाजी करत होते. त्यामुळे भारतीय संघाच्या हातातून सामना सुटत होता. बांगलादेशचा फलंदाज लिटन दास बाद झाला आणि संपुर्ण सामनाच पटलटला. त्यानंतर बांगलादेशच्या एकामागोमाग एक विकेट्स गेल्या. त्यामुळे भारतीय संघाने हा सामना ५ धावांनी जिंकला.
महत्वाच्या बातम्या-
KL Rahul : तो थ्रो नव्हता, ते तर राहूलच्या हातातून सुटलेलं रॉकेट होतं ज्यात उद्धवस्त झाला बांगलादेश
Dinesh Karthik : अंपायर आंधळा आहे का? धावबाद नसतानाही दिनेश कार्तिकला बाद दिल्यामुळे चाहते संतापले
Dream 11 : शेतकऱ्याच्या मुलाने रचला इतिहास, ड्रीम ११ वर जिंकले तब्बल १ कोटी रुपये, ‘असा’ केला हा कारनामा






