भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना शनिवारपासून सुरु झालेला आहे. हा सामना बंगळुरू येथे खेळला जात आहे. टीम इंडिया मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. मोहालीत खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाने श्रीलंकेचा एक डाव आणि २२२ धावांनी पराभव केला. त्याआधी टी-२० मालिकेत ३-० ने टीम इंडिया जिंकली होती. (indian team records after 90 years)
आता भारतीय संघाच्या नजरा कसोटीतही क्लीन स्वीपवर आहेत. जर टीम इंडिया हे करू शकली तर ९० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका नवीन विक्रमाची भर पडेल.भारतीय संघाची नजर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग ११ व्या विजयावर आहे. या वर्षी २३ जानेवारी रोजी दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय सामना गमावल्यानंतर टीम इंडियाने सलग १० सामने जिंकले आहेत.
प्रथम तीन एकदिवसीय आणि तीन टी २० मध्ये वेस्ट इंडिजचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी श्रीलंकेविरुद्ध तीन टी २० आणि एक कसोटी सामना जिंकला. भारतीय संघाने बंगळुरू कसोटी जिंकल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्यांचा हा ११ वा विजय ठरेल.
तसेच टीम इंडियाची नजर सलग दुसऱ्यांदा कोणत्याही फॉरमॅटमध्ये दोन मालिका जिंकण्यावर असेल. टीम इंडियाला त्यांच्या ९० वर्षांच्या क्रिकेट इतिहासात सलग दोन किंवा अधिक फॉरमॅटच्या मालिकेत दोन संघांविरुद्ध क्लीन स्वीप करण्यात कधीही यश आलेले नाही.
टीम इंडियाने यापूर्वी वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन मालिकेतील सर्व सामने जिंकले होते. आता ती श्रीलंकेविरुद्ध टी २० आणि कसोटी मालिकेत क्लीन स्वीप करू शकते. याआधी टीम इंडियाने टी २० मालिका ३-० अशी जिंकली होती. आता कसोटी मालिका २-० ने टीम इंडिया जिंकावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे.
या मालिकेबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघ सलग १५ कसोटी मालिका जिंकण्यासाठी मैदानावर उतरली आहे. २०१२-१३ मध्ये टीम इंडियाला घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर एकाही मालिकेत टीम इंडियाचा पराभव झालेला नाही. श्रीलंकेविरुद्धच्या विक्रमावर नजर टाकल्यास २००८ पासून भारताने त्यांच्याविरुद्ध एकही कसोटी मालिका गमावलेली नाही.
महत्वाच्या बातम्या-
‘पवारांचे दाऊदवर इतकच प्रेम असेल तर त्यांनी केबिनमधून गांधीजींचा फोटो काढून दाऊदचा फोटो लावावा’
भाजपचा केंद्रीय मंत्री राहीलेला ‘हा’ अभिनेता तृणमूलकडून खासदारकीच्या रणांगणात उतरणार; ममतांची घोषणा
काँग्रेस आमदाराचे वादग्रस्त विधान; म्हणाले, दारू ही आमची संस्कृती आहे, घरात 12 बाटल्या ठेवायला हव्यातच