प्रेमाला वय नसतं, सीमा नसतात, बंधनं नसतात असं म्हणतात. जेव्हा दोन हृदये भेटतात तेव्हा प्रेम फुलते. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि बंगाल रणजी संघाचे विद्यमान प्रशिक्षक अरुण लाल यांच्या आयुष्यातही असेच काहीसे घडले. वयाच्या ६६ व्या वर्षी माजी क्रिकेटपटू अरुण लाल यांनी त्यांच्यापेक्षा २८ वर्षांनी लहान असलेल्या बुलबुल साहासोबत लग्न केले.
अरुण लाल यांचे हे दुसरे लग्न आहे. कुटुंबीय आणि जवळचे मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत दोघांनी आज कोलकात्यात सात फेरे घेतले आणि आज म्हणजेच सोमवारी लग्न केले. अरुण लाल (६६) यांनी कोलकाता येथे त्यांच्यापेक्षा २८ वर्षांनी लहान असलेल्या बुलबुल साहासोबत लग्न केले. त्याचे हे दुसरे लग्न आहे.
माजी क्रिकेटपटू आणि बंगाल रणजी संघाचे विद्यमान प्रशिक्षक अरुण लाल यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी दुसरं लग्न केलं. १ मे रोजी कोलकाता येथे नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत दोघांनी लग्न केले. अरुण लालने बुलबुल साहासोबत लग्नानंतर पत्नीला किस करतानाचा फोटोही शेअर केला आहे.
दोघांनी कोलकाता येथे लग्नाची रजिस्ट्री केली होती, त्यानंतर केक कापून त्यांनी एकमेकांना किस केलं. बुलबुल साहाने तिच्या फेसबूक पेजवर फोटो पोस्ट केले आहेत. दोघेही एकमेकांचा हात धरताना दिसत आहेत. त्याचबरोबर लग्नात सहभागी झालेले पाहुणेही त्यांच्या आनंदात सहभागी झाले आहे. अरुण लाल आणि बुलबुल यांच्या हळदीचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
लग्नाच्या निमित्ताने बुलबुल साहाने स्टिलेटो ब्लाउजसह लाइट क्रीम कलरची साडी आणि सोन्याचा नेकलेस घातला होता, तर अरुण लाल यांनीही सिक्रीन कलरच्या हाफ जॅकेटसह फिकट क्रीम कलरचा कुर्ता घातला होता. लग्नाला जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. अरुण लाल यांचा मित्र आणि माजी क्रिकेटर सबा करीमनेही लग्नाला हजेरी लावली होती.
अरुण लाल यांचे हे दुसरे लग्न आहे. त्यांचा पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाला असून ती खूप आजारी आहे. तिच्या इच्छेनंतर त्यांनी पहिल्या पत्नीच्या संमतीनंतर दुसरे लग्न केले. अरुण आणि बुलबुल हे एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होते आणि आता त्यांचे नाते लग्नाच्या बंधनात बांधले गेले आहे.
अरुण लाल आणि बुलबुल यांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या घरी झाली. पहिल्याच भेटीनंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही एकमेकांसाठी बनलेले आहेत हे दोघांनाही कळले. मग भेटण्याचा सिलसिला वाढू लागला आणि एके दिवशी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
साहा कोलकाता येथील एका शाळेत शिक्षिका आहेत. तिने २०१९ मध्ये कुकिंग स्पर्धेतही भाग घेतला आहे. बुलबुलने त्याच्या फेसबुक पेजवर लग्नाचे, हळदीचे अनेक फोटो शेअर केले आहेत. वयात अंतर असूनही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याच बरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे लग्न अरुण लाल यांची पहिली पत्नी रीना हिच्या इच्छेने झाले आहे.
दरम्यान, अरुण लाल यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी १६ कसोटी सामने खेळले. त्यांनी १३ वनडेत १२२ धावा केल्या आहेत. अरुण लाल यांची कारकीर्द १९८२ ते १९८९ अशी आहे. अरुण लाल सध्या पश्चिम बंगालच्या रणजी संघाचे प्रशिक्षक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली बंगालचा संघ २०२२ साली रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला होता.
महत्वाच्या बातम्या
धार्मिक स्थळापासून २०० मीटरपर्यंत लाऊडस्पीकरला बंदी; सोबतच आणखी ‘हे’ निर्बंध
पुन्हा टॉलिवूडने बॉलिवूडला झोपवलं, KGF 2 ने रचला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करणारा ४ था चित्रपट
तुमच्या घरापासून चैत्यभूमी ५ मिनिटांवर, कधी तिथे गेलात का? बाबासाहेबांना हार घातला का?
अबू आझमींचा राज ठाकरेंवर निशाणा; म्हणाले, ‘भुंकणाऱ्या कुत्र्यांची तोंड बंद करा..’