अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बुधवारी झालेल्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताने ४४ धावांनी विजय मिळवला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या पूर्णवेळ कर्णधारपदाची सुरुवात मालिका विजयाने झाली आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत टीम इंडिया आता २-० ने पुढे आहे आणि मालिका जिंकली आहे. (india won one day series)
प्रथम फलंदाजी करताना भारताने २३७ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या १९३ धावांवर आटोपला. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने चार विकेट घेतल्या. विशेष म्हणजे वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर भारताचा हा सलग सातवा एकदिवसीय मालिका विजय आहे.
केवळ २३८ धावांवर बचावासाठी उतरलेल्या टीम इंडियाला त्याच्या गोलंदाजांनी वाचवले. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने संपूर्ण सामन्यात अप्रतिम गोलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या टॉप ऑर्डरचा तंबुत पाठवले. कृष्णाने पहिल्या दोन षटकांत दोन बळी घेतले होते. टीम इंडियाच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजचा निम्मा संघ अवघ्या ७६ धावांत बाद झाला.
विशेष बाब म्हणजे कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजीत अनेकदा असे बदल केले, त्यानंतर लगेचच भारताला विकेट मिळाल्या. गेल्या सामन्यात अष्टपैलू दीपक हुड्डाला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही, पण यावेळी तो गोलंदाजीसाठी आला आणि त्याने पहिल्याच षटकात विकेट घेतली.
भारताकडून सर्व गोलंदाजांनी विकेट घेतल्या, प्रसिद्ध कृष्णाने ९ षटकात १२ धावा देत चार विकेट घेतल्या. त्याचवेळी शार्दुल ठाकूरला दोन, युझवेंद्र-सिराज-सुंदर-हुडा यांना प्रत्येकी एक विकेट घेता आली. पण दुसऱ्या सामन्यात फलंदाजीच्या बाबतीत टीम इंडिया सपशेल अपयशी ठरली.
सर्वांना आश्चर्यचकित करून रोहित शर्माने ५ धावा, तर ऋषभ पंतला १८ धावा केल्या. विराट कोहलीही केवळ १८ धावा करू शकला. मात्र, यानंतर उपकर्णधार केएल राहुल ४९ आणि सूर्यकुमार यादवने ६४ करत भारतासाठी चांगला स्टोक उभारण्यास मदत केली.केएल राहुल त्याच्या चुकीमुळे धावबाद झाला, त्यानंतर सूर्यकुमार यादवनेही खराब शॉट खेळून आपली विकेट गमावली. शेवटी, दीपक हुडा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी छोटे डाव खेळून टीम इंडियाची धावसंख्या २३७ पर्यंत नेली.
महत्वाच्या बातम्या-
चीनमध्ये बनवला आहे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी, 1600 तुकडे करून आणला भारतात, किंमत वाचून अवाक व्हाल
कर्नाटक हिजाब प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात; मुंबई, मालेगावात मुस्लिम तरुण-तरुणी रस्त्यावर
SIP calculator: महिन्याला केवळ १००० रुपये जमा करा, तुम्हाला मिळतील २ कोटींपेक्षा जास्त रुपये