IND vs SA | भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिका संघात मालिकेचा दुसरा टी-२० सामना आज पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताने २० षटकात २३७ धावा करत दक्षिण आफ्रिकेला घाम फोडला. हे आव्हान पार करत दक्षिण आफ्रिकेला २२१ धावाच करता आल्या. दक्षिण आफ्रिकेनेही चांगली खेळी केली. भारतीय संघाने हा सामना १६ धावांनी जिंकत मालिकेत २-० ने आघाडी घेतली आणि मालिका आपल्या नावावर केली.
या सामन्यात रोहित शर्मा आणि केएल राहुल सलामीस आले असून केएल राहुलने दमदार अर्धशतकी खेळी केली. तर त्याला साथ देत रोहितने ३७ चेंडूत ४३ धावा केल्या. यामध्ये त्याने ७ चौकार आणि १ षटकार मारले. त्यानंतर संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवने संघाचा भार सांभाळला. या सामन्यात विराटने २८ चेंडूत नाबाद ४९ धावांचे योगदान दिले.
मात्र फक्त १ धाव पाहिजे असताना त्याचे अर्धशतक हुकले. तसेच सूर्यकुमार ने स्फोटक फलंदाजी करत अवघ्या २२ चेंडूत ६१ धावा केल्या. यामध्ये ५ चौकार तर ५ षटकारांचा समावेश आहे. सूर्यकुमार बाद होताच दिनेश कार्तिक फलंदाजी आला त्याने ७ चेंडूत १ चौकार आणि २ षटकार मारत १७ धाव केल्या. तर आफ्रिकेकडून गोलंदाजी करत केशव महाराज ४ षटकात २३ धावा देत २ विकेट्स घेतल्या.
त्याचबरोबर भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेंबा बावुमा, रिले रुसोला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर क्विंटन डी कॉक आणि एडन मार्करामने दमदार खेळी केली. मार्करामने या सामन्यात १९ चेंडूत ३३ धावा केल्या. क्विंटन डी कॉकने ४८ चेंडूत नाबाद ६९ धावा केल्या आणि त्याला साथ देत डेव्हिड मिलरने दमदार फलंदाजी करत अवघ्या ४७ चेंडूत नाबाद १०६ धावा करत आपले शतक पुर्ण केले.
भारताकडून गोलंदाजी करत दीपक चहर आणि अर्शदिप सिंग या जोडीने धुमाकूळ घातला. यामध्ये अर्शदीपने ४ षटकात ६२ धावा देत २ विकेट्स घेतल्या. चहरने ४ षटकात १ मेडन टाकत २४ धावा दिल्या. मात्र त्याला एकही विकेट घेता आली नाही. अक्षर पटेलने ४ षटकात ५३ धावा देत १ विकेट घेतली. हर्षल पटेलने ४ षटकात ४५ धावा दिल्या. रविचंद्रन अश्विनने ४ षटकात ३७ धावा दिल्या. त्यालाही एकही बळी घेता आला नाही.
महत्वाच्या बातम्या
eknath shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ, वाचा नेमकं काय घडलंय?
Actress : धक्कादायक! शूटिंगदरम्यान बेशुद्ध झाली अभिनेत्री, किडनी झाली निकामी, प्रकृती चिंताजनक
shivsena : ..तेव्हा एकनाथ शिंदेंनीच आनंद दिघेंच्या पाठीत खंजीर खुपसला; शिवसेनेचा गौप्यस्फोट
shivsena : शिवसैनिकाने रक्ताने पत्र लिहीत दाखवली निष्ठा ; अन् नंतर उद्धव ठाकरेंनी दिला सुखद धक्का, वाचा नेमकं काय घडलं?