Share

IND vs AUS : रोहितच्या वादळात ऑस्ट्रेलिया हतबल; भारताचा ६ विकेट्स राखून दिमाखदार विजय, मालिकेत बरोबरी

IND vs AUS | भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात टी-२० मालिकेचा दुसरा सामना आज पार पडला. हा सामना पावसामुळे नियमित वेळेपेक्षा उशिरा सुरु झाला. त्यामुळे हा सामना ८-८ षटकांचा झाला.  दिनेश कार्तिकने २ चेंडूत १० धावा काढल्या. तर कर्णधार रोहित शर्माने २० चेंडूत दमदार खेळी करत ४६ धावा केल्या.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. तर ऑस्ट्रेलिया संघाने फलंदाजी करत ८ षटकात ९१ धावांचे आव्हान ठेवले. हे आव्हान पार करत भारताने हा सामना ६ विकेट्सने जिंकला. यासह या मालिकेत दोन्ही संघाने १-१ अशी बरोबरी साधली.

ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करत ऍडम झॅम्पाने उत्कृष्ट कामगिरी करत २ षटकात १६ धावा देत सर्वाधिक ३ विकेट्स काढल्या. त्याला साथ देत पॅट कमिन्सने २ षटकात २३ धाव देत १ विकेट घेतली. तसेच भारतीय संघाकडून फलंदाजी करत केएल राहुल आणि रोहित शर्मा फलंदाजी आले. या सामन्यात केएल राहुलने ६ चेंडूत १० धावा केल्या.

विराट कोहलीलाही या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. तोही ६ चेंडूत ११ धावा केल्या. त्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजी आला, मात्र तोही खाते न उघडता तंबूत परतला. त्यानंतर हार्दिक पांड्या मैदानात उतरला. मात्र तोही ९ चेंडूत ९ धावा काढत बाद झाला.

तर या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करत आरोन फिंच आणि कॅमेरून ग्रीन सलामीस आले. आरोन फिंचने १५ चेंडूत ३१ धाव केल्या. यामध्ये कॅमेरून ग्रीन ४ चेंडूत ५ धावा करत बॅड झाला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल फलंदाजीस आला मात्र त्याला खातेही उघडता आले नाहीत आणि तो अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला.

टीम डेव्हिड ३ चेंडूत २ धावा करत बाद झाला. यानंतर मॅथ्यू वेडने दमदार खेळी करत २० चेंडूत नाबाद ४० धावांचे योगदान दिले. तर स्टिव्ह स्मिथने ५ चेंडूत ८ धावा केल्या. तसेच भारतीय संघाकडून गोलंदाजी करत अक्षर पटेलने २ षटकात १३ धावा देत २ विकेट्स घेतल्या.

त्याला साथ देत जसप्रीत बुमराहने २ षटकात २३ धावा देत १ विकेट घेतली. तर हर्षल पटेल आणि विराट कोहलीने १-१ फलंदाज रण आऊट केले. दरम्यान आता तिसरा सामना हा निर्णायक सामना असणार आहे. तिसऱ्या सामन्यावर भारताचे भवितव्य अवलंबून आहे.

महत्वाच्या बातम्या
shrikant shinde : CM खुर्चीत बसून कारभार? सत्य समोर येताच श्रीकांत शिंदेंवर आरोप करणारे राष्ट्रवादीचे वर्पे तोंडावर आपटले
shinde group : “शिवसैनिकांमध्ये CM शिंदेंबद्दल आनंदाच वातावरण, शिवाजी पार्क आम्हाला कमीच पडलं असतं”
Ajit Pawar : मविआमध्ये मला गृहमंत्रीपद हवं होतं पण वरिष्ठांनी…; अजितदादांची खदखद अखेर बाहेर आलीच, म्हणाले..
jitendra awhad : जितेंद्र आव्हाड CM शिंदेंच्या भेटीला; वादळी भेटीत नेमकं घडलं काय? वाचा सविस्तर

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now