Share

रोहित-गिलच्या धडाक्यानंतर गोलंदाजांनी ओकली आग, किवींचा धुव्वा उडवत भारत बनला नंबर वन

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका समाप्त झाली आहे. या मालिकेतील शेवटचा सामना २४ जानेवारी रोजी होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदूर येथे खेळला गेला. रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या शतकांमुळे मेन इन ब्लूने 9 विकेट गमावून 386 धावांचे लक्ष्य ठेवले.

प्रत्युत्तरात दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाची सुरुवात चांगली झाली. असे असूनही, पाहुण्या संघाला विजयाची नोंद करता आली नाही आणि केवळ 295 धावा करता आल्या. परिणामी भारताने 90 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताने ३ सामन्याच्या मालिकेतील सगळे सामने जिंकले.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणार्‍या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने शतकी डावात पहिल्या विकेटसाठी २१२ धावांची भागीदारी केली. भारताच्या या जोडीने पॉवरप्लेमध्ये 82 धावांची भर घातली, त्यानंतर त्यांना रोखणे किवी संघासाठी खूप कठीण झाले.

मात्र, ब्रेसवेलने 27व्या षटकात 101 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर रोहितला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. यानंतर भारतीय खेळाडूंच्या विकेट पडण्याची प्रक्रिया सुरू झाली. रोहित बाहेर पडताच पुढच्या षटकात शुभमनही पॅव्हेलियनमध्ये परतला.

या सामन्यात गिलने 112 धावा केल्या. कोहली 36 धावा, ईशान 17 धावा, सूर्यकुमार यादव 14 धावा, वॉशिंग्टन सुंदर फक्त 9 धावांची खेळी करू शकला. हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर यांनी अर्धशतकी भागीदारी करून संघाला कमी अंतरात विकेट पडल्यानंतर मजबूत स्थितीत आणले.

हार्दिकने झटपट 54 धावा केल्या, तर शार्दुलच्या बॅटमधून 25 धावा आल्या. अखेर भारताने नऊ गडी गमावून 385 धावा केल्या. न्यूझीलंडकडून ब्लेअर टिकनर आणि जॅक दुबे यांना प्रत्येकी तीन बळी घेता आले. या व्यतिरिक्त मायकेल ब्रेसवेलला ब्रेकथ्रू मिळाला.

या सामन्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतके आपल्या नावे केली. तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात, हिटमॅनने त्याचे 30 वे एकदिवसीय शतक झळकावले, ज्यानंतर त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत रिकी पाँटिंगची बरोबरी केली.

तथापि, त्यांच्या पुढे विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर आहेत ज्यांची या फॉरमॅटमध्ये अनुक्रमे 46 आणि 49 शतके आहेत. याशिवाय गिलने किवी संघाविरुद्धच्या मालिकेत एकूण 360 धावा करून एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत बाबर आझमची बरोबरी केली आहे.

अनेक दिवस शतकाच्या शोधात हिटमॅनने सर्व बंधने झुगारून न्यूझीलंडविरुद्ध झंझावाती पद्धतीने शतक झळकावले. 509 दिवसांनंतर रोहितच्या नावासमोर 100 हून अधिक धावा गेल्या आहेत, त्याने ही खास खेळी अतिशय खास पद्धतीने साजरी केली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

फलंदाजीच्या बाबतीत रोहित शर्मासाठी गेले काही महिने फारसे गेले नाहीत. विशेषतः T20 विश्वचषक 2022 मध्ये त्याचा खराब फॉर्म भारताच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण ठरले. मात्र आता नवीन वर्षात रोहितने पुन्हा जुन्या स्टाईलमध्ये पुनरागमन केले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याने फॉर्ममध्ये परतण्याचा ट्रेलर दाखवला.

महत्वाच्या बातम्या
बॉलर्सच्या तडाख्यानंतर रोहीतच्या वादळात न्युझीलंड उद्धवस्त; भारताने सामन्यासह मालिकाही जिंकली
अथिया शेट्टी आता बनली मिसेस केएल राहुल, पहिल्या पोस्टमध्ये रोमँटिक होत म्हणाली; तुझ्या सोबत..

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now