Share

India : अखेर ठरलं! भारत सेमी फायनलमध्ये भिडणार ‘या’ संघासोबत, जाणून कधी आणि कुठे आहे सामना

indian team

india vs england semifinal  | २०२२ च्या टी २० वर्ल्डकपमध्ये  भारतीय संघ खुप चांगली कामगिरी करताना दिसून येत आहे. सुपर १२ टप्प्यातील शेवटच्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा पराभव करत गट २ मध्ये अव्वल स्थान पटकावले. भारतासोबतच पाकिस्ताननेही या गटातून सेमी फायनलमध्ये धडक मारली असून आता सेमी फायनलमध्ये कोणता संघ कोणाचा सामना करणार हे स्पष्ट झाले आहे.

टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये इंग्लंडचा सामना करावा लागणार आहे, १० नोव्हेंबरला ऍडलेडच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने येतील. म्हणजेच वर्ल्डकपची फायनल काहीच दिवसांच्या अंतरावर आहे. भारताला सेमी फायनल आणि फायनलमध्ये विजय मिळवायचा त्यानंतर तब्बल १५ वर्षांनंतर भारतीय संघाच्या हातात वर्ल्डकपची ट्रॉफी असणार आहे.

खालील चार संघानी सेमी फायनलमध्ये आपली जागी निश्चित केली आहे.
गट १- न्यूझीलंड, इंग्लंड
गट २: भारत, पाकिस्तान

जाणून घेऊया मग नक्की सेमी फायनल कधी आणि कुठे असणार आहे?
सेमी फायनलचा पहिला सामना- न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान – ९ नोव्हेंबर, सिडनी (दुपारी १.३०)
सेमी फायनलचा भारत विरुद्ध इंग्लंड – १० नोव्हेंबर, अॅडलेड (दुपारी १.३०)

दरम्यान, झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना १८६ धावा केल्या होत्या, सामन्यात भारताची अवस्था बिकट झाली होती कारण १०१ धावांवर चार विकेट पडल्या होत्या. पण नंतर सूर्यकुमार यादवने अप्रतिम खेळी खेळली, त्याने अवघ्या २५ चेंडूत ६१ धावा केल्या. या अप्रतिम खेळीच्या जोरावर भारताने १८६ धावांचा मोठा स्कोर उभा केला.

झिम्बाब्वेला मात्र भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकावे लागले. झिम्बाब्वेची अवस्था अशी होती की अवघ्या ३६ धावांवर त्यांच्या पाच विकेट पडल्या होत्या. अशा स्थितीत त्यांना सामना जिंकणे कठीण झाले होते. सामन्यात टीम इंडियाच्या रविचंद्रन अश्विनने ३, हार्दिक पांड्या २ आणि मोहम्मद शमीने २ विकेट्स घेतल्या आहेत. सामन्यात झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ २० षटकेही खेळू शकला नाही आणि ११५ धावांवर त्यांचे सर्व खेळाडू बाद झाले.

महत्वाच्या बातम्या-
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवने विराट-रोहितला टाकलं मागे, टी २० वर्ल्डकपमध्ये शतक ठोकत केला ‘हा’ मोठा विक्रम
Devendra Fadanvis : शिवसेना बेईमान होती, त्यांच्या बेईमानीचा बदला मी घेतला, मला त्याचा आनंद – फडणवीस
Pakistan : अखेरच्या सामन्यात बांगलादेशचा पराभव, ५ विकेट्सने सामना जिंकत पाकिस्तान सेमी फायनलमध्ये

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now