भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक एचडीएफसी बँक आणि सर्वात मोठी गृहनिर्माण वित्त कंपनी एचडीएफसी लिमिटेड यांच्या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळाने सोमवारी झालेल्या स्वतंत्र बैठकीत यासंबंधीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. (india this bank merge too soon)
आता काही नियामकांना मंजूरी मिळताच ते दोघे विलीन होतील. अशा परिस्थितीत या विलीनीकरणामुळे ग्राहकांवर काय परिणाम होणार आहे? असा प्रश्न सर्वात मोठ्या खासगी बँकेच्या करोडो ग्राहकांच्या मनात निर्माण होत आहे. या डीलमुळे एचडीएफसी बँक खातेधारकांवर कसा परिणाम होईल, आज आपण ते जाणून घेणार आहोत.
विलीनीकरणानंतर, एचडीएफसी लिमिटेडची एचडीएफसी बँकेत ४१ टक्के भागीदारी असेल. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर, एचडीएफसी बँक रेकॉर्ड तारखेला एचडीएफसी लिमिटेच्या भागधारकांना इक्विटी शेअर्स जारी करेल. विलीनीकरणाच्या प्रस्तावातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एचडीएफसी लिमिटेडच्या सर्व उपकंपन्या आणि सहयोगी एचडीएफसी बँकेचा भाग बनतील.
या कंपन्या एकत्र आल्यामुळे एचडीएफसी बँकेला फायदा होईल आणि असुरक्षित कर्जांमधील एक्सपोजरचा हिस्सा कमी होईल. विलीनीकरणानंतर, एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना सर्वात मोठा फायदा हा आहे की त्यांना आता एकाच छताखाली अतिरिक्त सेवा मिळतील, ज्या एचडीएफसी लिमिटेच्या पोर्टफोलिओचा भाग आहेत.
या करारांतर्गत एचडीएफसी लिमिटेडचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण होणार असल्याने, खातेधारकांच्या कागदपत्रांवर किंवा बँकेच्या भागधारकांवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. बँकेच्या ग्राहकांना आधीच उपलब्ध असलेल्या सर्व सेवा तर मिळणारच, आता काही नवीन उत्पादनेही उपलब्ध होणार आहेत. दुसरीकडे एचडीएफसी लिमिटेडचे सर्व ग्राहक आता थेट एचडीएफसी बँकेचा भाग बनतील.
विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँकेत प्रोमोटर राहणार नाही. कंपनी १०० टक्के पब्लिक होल्डिंग कंपनी असेल. विलीनीकरणानंतर बँकेला फंड कमी लागेल. याचा फायदा ग्राहकांना होणार आहे. तसेच विलीनीकरणामुळे असुरक्षित कर्जे कमी होतील.
महत्वाच्या बातम्या-
भाषण सुरु असतानाच सुरु झाली अजान अन् गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी…; व्हिडीओ तुफान व्हायरल
पोद्दार शाळेची विद्यार्थ्यांनी भरलेली बस चार तास कुठे गायब होती? विश्वास नांगरे पाटलांनी दिले स्पष्टीकरण
माझ्या नवऱ्याची एक भानगड काढा, मी राजकारण सोडेन; चित्रा वाघांचं ओपन चॅलेंज