युक्रेन आणि रशियामध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्वभुमीवर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला. भारत सरकारने युक्रेनमधील भारतीय दुतावासांतील अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना भारतात परत बोलावुन घेतले आहे. याबाबतची माहिती एएनआयच्या वृत्तात देण्यात आली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या वादाची स्थिती पाहता भारत सरकारने हे पाऊल उचलले आहे.
यासंबंधी भारतीय दूतावासाने एक अॅडव्हायझरी जारी केले आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, जर युक्रेनमध्ये थांबणे गरजेचे नसेल तर भारतीय नागरिकांनी पुन्हा मायदेशी परत यावे. तसेच विद्यार्थ्यांना चार्टर फ्लाइट्सच्या अपडेट्ससाठी संबंधित विद्यार्थी कंत्राटदारांशी संपर्क साधण्याचा सल्लाही अॅडव्हायझरीमध्ये देण्यात आला आहे.
दुसऱ्या बाजुला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या कार्यालयातून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. ज्यात “युक्रेनवर हल्ला करण्याचा कोणताही विचार नाही आहे. आम्ही कधीही कोणावर हल्ला केलेला नाही. डोनबासमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचे परिणाम गंभीर असतील” असे सांगण्यात आले आहे.
या युध्दाच्या पार्श्वभुमीवर व्लादिमीर पुतिन आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात सुमारे 1 तास 45 मिनिटं चर्चा झाली आहे. ही चर्चा सकारात्मक झाली असून पहिल्यांदा या दोघांमध्ये एकमत झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता पुतिन आणि मॅक्रॉनसोबत काय भुमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान जर रशियाने युक्रेनवर हल्ला केला तर त्याच्यावर आर्थिक प्रतिबंध लागु करण्यात येतील. असा इशारा अमेरिकेने दिला आहे. त्याचबरोबर युक्रेनच्या संकटावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक बोलावणार असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिली आहे.
युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या युध्दाचे परिणाम आजुबाजूच्या देशांवर होण्यास सुरुवात झाली आहे. यात रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याचे वृत्त नाकारले आहे. रशियाने युक्रेन बॉर्डरवर इस्कंदर क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. ही क्षेपणास्त्रे युक्रेनच्या सीमेपासून 30 किमी अंतरावर असलेल्या ब्रयांस्कमध्ये दिसली असल्याची माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या
“माझी मुलगी स्वत: १२ तास झोपते आणि मी झोपलो की..”, कपिल शर्माने सांगितला भन्नाट किस्सा
सॅल्युट! जवानाने बर्फाने साकारला शिवाजी महाराजांचा १० फुटांचा पुतळा, व्हिडीओ झाला व्हायरल
मी मुख्यमंत्री झालो नाही एवढंच बोंबलायचं आणि…, गुलाबराव पाटलांची एकनाथ खडसेंवर जहरी टीका
देशी दारूसाठी तरूणाने केला शोले स्टाईल धिंगाणा, टॉवरवर चढला आणि.., वाचून पोट धरून हसाल