यंदाच्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कपची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांना पुन्हा एकदा आशिया चषकात भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) ही सर्वात मोठी लढत पाहायला मिळणार आहे. 2012-13 नंतर दोन्ही देशांमधील द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही. दोन्ही संघ आयसीसी स्पर्धांमध्ये किंवा आशिया कपसारख्या स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात.
यावर्षी आशिया चषक श्रीलंकेच्या मैदानावर खेळवला जाणार आहे, ज्याबद्दल एक मोठे अपडेट समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही स्पर्धा 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. आगामी T20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून यावेळी आशिया चषक फक्त T20 फॉरमॅटमध्येच खेळवला जाणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने सायंकाळी 7 किंवा 8 वाजता सुरू होतील. त्याचबरोबर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना २८ ऑगस्टला होणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खास बनवण्यासाठी ब्रॉडकास्टर्सही सज्ज झाले आहेत. 28 ऑगस्टला ज्या दिवशी हा महान सामना रंगणार आहे, तो दिवस रविवार आहे. प्रत्येकाला रविवारी सुट्टी असते आणि यापेक्षा मोठी गोष्ट क्रिकेट चाहत्यांसाठी काय असू शकते. एशियन कौन्सिलसह ब्रॉडकास्टर्स आणि स्ट्रीमर्सना नक्कीच या मॅचमधून जास्तीत जास्त टीआरपी मिळवायला आवडेल.
गेल्या वर्षी यूएईमध्ये खेळलेला टी-२० विश्वचषक भारतीय चाहते विसरलेले नाहीत. या स्पर्धेत पाकिस्तानने टीम इंडियाला एकतर्फी सामन्यात लाजिरवाणा पराभव तर दिलाच, पण अशा काही जखमाही केल्या, ज्यांच्या कटू आठवणी आजही भारतीय चाहत्यांना टोचतात. प्रथम फलंदाजी करताना भारताने पाकिस्तानला 152 धावांचे लक्ष्य दिले होते, जे पाकिस्तान संघाने 18 व्या षटकात एकही विकेट न गमावता पूर्ण केले.
1992 नंतर कोणत्याही विश्वचषकात (ODI आणि T20) भारताविरुद्ध पाकिस्तानचा हा एकमेव विजय होता. आशिया चषक स्पर्धेत रोहित अँड कंपनीला यावेळी बदला घेण्याची चांगली संधी असेल. आशिया चषक 6 संघांमध्ये खेळवला जाणार आहे. यजमान श्रीलंकेव्यतिरिक्त भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचे संघ या स्पर्धेत भाग घेणार आहेत. तर सहावा संघ पात्रता फेरीतून येईल.
क्वालिफायर स्पर्धा यूएई आणि कुवेत यांच्यात होणार आहे. ही स्पर्धा गेल्या वर्षी खेळवली जाणार होती, पण कोरोनाच्या वाढत्या केसेस पाहता ती एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली होती. आशिया कपमध्ये सर्वाधिक स्पर्धा खेळण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे. श्रीलंकेचा संघ एकूण १४ वेळा या स्पर्धेत सहभागी झाला आहे. त्याचबरोबर भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांनी ही स्पर्धा 13 वेळा खेळली आहे.
आशिया चषक 6 संघांमध्ये खेळवला जाणार आहे. यजमान श्रीलंकेव्यतिरिक्त भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचे संघ या स्पर्धेत भाग घेणार आहेत. तर सहावा संघ पात्रता फेरीतून येईल. क्वालिफायर स्पर्धा यूएई आणि कुवेत यांच्यात होणार आहे.
ही स्पर्धा गेल्या वर्षी खेळवली जाणार होती, पण कोरोनाच्या वाढत्या केसेस पाहता ती एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली होती. आशिया कपमध्ये सर्वाधिक स्पर्धा खेळण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे. श्रीलंकेचा संघ एकूण १४ वेळा या स्पर्धेत सहभागी झाला आहे. त्याचबरोबर भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांनी ही स्पर्धा 13 वेळा खेळली आहे.
महत्वाच्या बातम्या
रणवीर सिंग दीपिकाबद्दल असं काहीतरी म्हणाला की भडकली आलिया, म्हणाली, हे फक्त यासाठी बोलला ना..
शिवसेना संपायला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच जबाबदार कारण.., नारायण राणेंची सडकून टीका
वेस्ट इंडिज सिरीजमध्ये विराटचे नाव का नाही? स्वतः विराटच आहे याला जबाबदार, झाला मोठा खुलासा
एकनाथ शिंदेंकडून अब्दुल सत्तारांना बंडखोरीचे गिफ्ट, सत्तार म्हणाले, ‘ही मामुली गोष्ट नाही..’