Share

भारत लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर! २४ तासात रुग्णसंख्येत प्रचंड वाढ; आकडे पाहून धक्का बसेल

देशात पुन्हा एकदा कोरोना आकडेवारी वाढू लागली आहे. कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक होऊ लागला आहे. गेल्या २४ तासाची आकडेवारी पाहिली तर,२४ तासात देशातील रुग्णसंख्येत २१ टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येत आहे. नव्या कोरोना बाधितांची संख्या हि २७ हजार ५५३ एवढी आढळली आहे, तर २८४ रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. त्यातच आता देशात ओमिक्रॉनचा धोका वाढत चालला आहे. ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येने दीड हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

देशात गेल्या २४ तासांमध्ये तब्ब्ल २७ हजार ५५३ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली असून, जवळपास तीन महिन्यांतील हि सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आता १ लाख २२ हजार ८०१ इतकी झाली आहे. तर २८४ रुग्ण दगावले आहेत. मृतांचा एकूण आकडा आता ४ लाख ८१ हजार ७७० इतका झाला आहे. दुसरीकडे ओमिक्रॉन बाधितांचा आकडाही वाढत चालला आहे.

देशात ओमिक्रॉनचे आत्तापर्यन्त १ हजार ५२५ रुग्ण आढळले असून, त्यातील ५६० जण उपचारानंतर बरे झाले असून अन्य रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून, त्याची ४६० एवढी संख्या आहे. त्यातील १६० रुग्णांनी ओमिक्रॉनवर मात केली आहे. त्यानंतर, दिल्लीत ३५१ ओमिक्रॉन बाधित आढळले असून त्यातील ५७ रुग्ण बरे झाले आहेत. केरळमध्ये ओमिक्रॉनचे १०९ रुग्ण आहेत.

तर गुजरातमध्ये ओमिक्रॉनचे १३६ आणि तामिळनाडूत ११७ रुग्ण आढळले. मध्य प्रदेशात कोविडची स्थिती अद्याप इतकी गंभीर नाही. या राज्यात गेल्या २४ तासात १२४ नवीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत २३ राज्यांत ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. गेल्या २४ तासांत सर्वाधिक रुग्ण गुजरातमध्ये आढळले आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये आज लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत.

ही परिस्थिती पाहता केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रात्री कर्फ्यूसह गरजेनुसार निर्बंध घालण्याच्या सूचना केंद्राकडून देण्यात आल्या आहेत. याची अंमलबजावणी करताना, महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि इतर काही राज्यांनी रात्री कर्फ्यू लागू करताना नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

कोरोनाच्या दोन लाटा झेलल्यानंतर भारतात कोरोनाची तिसरी लाट येईल याची शक्यता बळावत चालली आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येने सर्वांचीच झोप उडवली आहे. त्यात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने येत्या काही दिवसांत रुग्णसंख्येचा स्फोट होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच गेल्या २४ तासांतील कोरोना व ओमिक्रॉनची आकडेवारी केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केली असून हे आकडे चिंतेत अधिकच भर घालणारे ठरले आहेत.
महत्वाच्या बातम्या
‘माझी लाडकी बाहुली, आदिती’ म्हणत धर्मेंद्र यांनी शेअर केला गुटगुटीत मुलीचा फोटो, कोण आहे ती?
”योगी आदित्यनाथ फक्त मोदींच्या सभेत गर्दी जमवण्यासाठी आहेत का?”
शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात झाले मोठे बदल, शासनाने जारी केले परिपत्रक

 

आरोग्य

Join WhatsApp

Join Now