india lost because of three players | न्युझीलंडविरुद्धचा पहिला वनडे सामना भारतीय संघाने गमावला आहे. न्यूझीलंडकडून यष्टिरक्षक फलंदाज टॉम लॅथमने शानदार शतक झळकावून न्युझीलंडच्या संघाला विजय मिळवून दिला होता. त्याच्याशिवाय कर्णधार केन विल्यमसननेही जबरदस्त खेळी खेळली आहे.
न्यूझीलंडकडून स्टार फलंदाज टॉम लॅथमने १४५ धावांची तुफानी खेळी केली. त्याचवेळी केन विल्यमसनही त्याच्यासोबत चांगला खेळला. केनने नाबाद ९४ धावा केल्या. या दोन्ही फलंदाजांमुळे टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. भारताकडून शार्दुल ठाकूरने १ आणि उमरान मलिकने २ बळी घेतले. त्याचवेळी उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांनी या सामन्यातून टीम इंडियासाठी पदार्पण केले.
भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरने ७६ चेंडूत ८० धावांची शानदार खेळी खेळली. शुभमन गिल आणि शिखर यांच्या शतकी भागीदारीमुळे (१२४ धावा) भारताने ५० षटकांत सात गडी गमावून ३०६ धावा केल्या. त्याचबरोबर न्यूझीलंडला विजयासाठी ३०७ धावांचे लक्ष्य देण्यात आले आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, त्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली.
या सामन्यात काही भारतीय खेळाडू पुर्णपणे फ्लॉप ठरले आहे. त्यांनी केलेल्या खराब खेळीमुळे त्यांची संघातून हकालपट्टी करा, असे चाहते म्हणत आहे. शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि शिखर धवन यांनी अर्धशतक झळकावले म्हणून चाहते त्यांचे कौतूक करत आहे. तर ऋषभ पंत, युझवेंद्र चहल, शार्दूल ठाकूर यांना मात्र ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू शार्दूल ठाकूर पहिल्या वनडे सामन्यात फ्लॉप ठरताना दिसला. त्याने एका षटकात २५ धावा दिल्या. तर ९ षटकात त्याने ६३ धावा दिल्या. त्यामुळे भारतीय चाहते त्याला खुप ट्रोल करत आहे. ऋभष पंतही फक्त १५ धावा करुन बाद झाला. तर चहलने सुद्धा १० षटकात ६७ धावा देऊन एकही विकेट घेतली नाही.
पहिल्या वनडे सामन्यात ऋषभ पंत, युझवेंद्र चहल, शार्दूल ठाकूर हे फ्लॉप ठरल्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. तसेच त्यांना संघातून काढण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत ३०६ धावा केल्या होत्या. पण खराब गोलंदाजीमुळे न्युझीलंडच्या संघाने ३०७ धावांचे लक्ष सहज गाठले.
महत्वाच्या बातम्या-
rupali bhosle : रुपाली भोसलेच्या चाहत्यांसाठी दु:खद बातमी; गंभीर आजारामुळे अभिनेत्री रुग्णालायत दाखल
Rohit Sharma : रोहित शर्मामुळे झाले ‘या’ स्टार खेळाडूचे करिअर उद्ध्वस्त? गंभीर आरोप करत म्हणाला…
Hemangi kavi : सुट्टीत सगळे सेलिब्रिटी गोव्यात एन्जाॅय करत असताना ‘ही’ अभिनेत्री गेली गावच्या जत्रेला; भक्तीत झाली तल्लीन