india lost against bangladesh | बांगलादेश दौऱ्यावर भारतीय क्रिकेट संघाला सलग दुसऱ्या सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात, टीम इंडिया पुन्हा एकदा गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये फ्लॉप ठरली. त्यामुळे दुसरा सामनाही भारताला गमवावा लागला.
७ डिसेंबर रोजी झालेल्या दुसऱ्या सामन्यात लिटन दासने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खराब सुरुवात केल्यानंतरही त्यांच्या संघाने भारतासमोर २७३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाला केवळ २६६ धावा करता आल्या. त्यामुळे बांगलादेशने ५ धावांनी हा सामना जिंकत मालिका नावावर केली आहे.
नाणेफेक जिंकून बांगलादेशचे फलंदाज फलंदाजीला आले. त्यांची सुरुवात खराब झाली असली तरी त्यांच्या दोन फलंदाजांनी कहर केला. ६९ च्या धावसंख्येवर बांगलादेशने आपले ६ फलंदाज गमावले होते. अशा स्थितीत संघाची जबाबदारी मागील सामन्यातील हिरो ठरलेल्या मेहदी हसन (१००*) आणि महमुदुल्लाह (७७) यांनी घेतली.
सुरुवातीला संयमी फलंदाजी करणाऱ्या दोन्ही फलंदाजांनी शेवटच्या काही षटकांत जोरदार फटकेबाजी करताना ७ व्या विकेटसाठी १४८ धावांची मोठी भागीदारी केली. शेवटी नसूम अहमदनेही मेहदीसोबत ५४ धावांची धमाकेदार भागीदारी केली. त्यामुळे बांगलादेशला २७१ धावा करता आल्या.
भारतासाठी या सामन्यात शिखर धवनसह विराट कोहली डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरले. पण दुसऱ्याच षटकात विराट कोहली बाद झाला. त्यानंतर विकेट्स पडतच गेल्या. सातत्याने विकेट पडल्यामुळे टीम इंडियाने अवघ्या ६५ धावांवर ४ फलंदाज गमावले होते.
अशा परिस्थितीत श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी १०७ धावांची भागीदारी केली. त्यानंतर दोघांनीही विके गमावल्या. शेवटी, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला कारण भारताचा कर्णधार रोहित शर्मा मैदानावर आला. त्याच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने तो फलंदाजी करत नव्हता. पण शेवटी मैदानावर येत त्याने २८ चेंडूत ५१ धावा केल्या. शेवटच्या चेंडूत भारताला ६ धावांची गरज होती. पण चेंडू हुकला आणि भारताने सामना गमावला.
महत्वाच्या बातम्या-
अक्षरश लाज निघाली! दुबळ्या बांगलादेशनेही भारताला हरवले; ‘या’ ५ खेळाडूंमुळे झाली लाजिरवाणी हार
बोटातून रक्त वाहत असूनही जखमी वाघासारखा लढला रोहीत; मॅचचा धक्कादायक शेवट
rahul gandhi : भारत जोडो यात्रेत लोक देत होते मोदी-मोदीच्या घोषणा, राहुल गांधींनी फ्लाइंग किस देत जिंकलं मन