Share

भारतातील ‘हे’ गाव आहे जगातील सर्वात श्रीमंत गाव; गावातील प्रत्येकाच्या खात्यात 15 लाखाहून अधिक पैसै, वाचा पुर्ण इतिहास

आज या जगात अनेक लोक आहेत जे दोन वेळच्या भाकरीसाठी रात्रंदिवस कष्ट करतात. असे काही लोक असतात ज्यांच्या नशिबात हेही नसते. आजच्या काळात प्रत्येकजण पैशाच्या मागे धावत आहे. मात्र वाढत्या महागाईमुळे लोकांना त्यांच्या गरजा पूर्ण करूनही काही बचत करता येत नाही.(india-is-the-richest-village-in-the-world-more-than-rs-15-lakh-in-each-account-in-the-village)

आज आम्ही तुम्हाला अशा एका गावाविषयी सांगणार आहोत जे संपूर्ण जगातील सर्वात श्रीमंत गाव आहे. या गावात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर कोट्यवधी रुपये जमा झाल्याचे सांगण्यात येते. हे श्रीमंत गाव आपल्याच देशात आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात वसलेले माधापर(Madhapar) नावाचे हे गाव बँक ठेवींच्या बाबतीत जगातील सर्वात श्रीमंत गावांपैकी एक आहे.

माधापर गावात 7600 हून अधिक घरे असून ती सर्व चांगल्या दर्जाची घरे आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या गावात 17 बँका आहेत. येथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या बँक खात्यात सुमारे पाच कोटी रुपये जमा आहेत. म्हणजेच या गावातील प्रत्येक व्यक्ती करोडपती आहे. येथे तुम्हाला सर्व सुविधा मिळतील. या गावात बँका, शाळा, महाविद्यालये, तलाव, उद्याने, रुग्णालये, मंदिरेही बांधली आहेत. गावात अत्याधुनिक गोशाळाही आहे.

आता तुम्ही विचार करत असाल की हे गाव भारतातील इतर गावांपेक्षा वेगळे का आहे? माधापर गावातील बहुतांश लोक अनिवासी भारतीय आहेत. त्यांचे नातेवाईक परदेशात व्यवसाय करतात. यात ब्रिटन(Britain), अमेरिका, आफ्रिका याशिवाय आखाती देशांचा समावेश आहे. हे लोक पैसे कमवून गावाच्या प्रगतीत मदत करतात आणि पैसा गोळा करतात.

माधापर गावात बहुसंख्य लोकसंख्या पटेल आहे. यातील 65 टक्क्यांहून अधिक लोक अनिवासी भारतीय आहेत. एका अहवालानुसार, 1968 मध्ये लंडनमध्ये माधापर व्हिलेज असोसिएशनची(Madhapar Village Association) स्थापना करण्यात आली होती, जेणेकरून परदेशातील लोक एकाच ठिकाणी सभा घेऊ शकतील. लोकांना एकमेकांशी जोडून ठेवण्यासाठी माधापर येथेही कार्यालय सुरू करण्यात आले. परदेशात राहूनही त्यांची ओढ गावाकडे आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आजही या गावाचा मुख्य व्यवसाय शेती आहे.

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now