Share

युएईचे राष्ट्राध्यक्ष शेख खलिफांचे निधन; भारतात मोदी सरकारने जाहीर केला राष्ट्रीय दुखवटा, राष्ट्रध्वज अर्ध्यावर

संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) राष्ट्राध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांचे निधन झाले आहे. ते ७३ वर्षांचे होते. राज्य वृत्तसंस्था डब्ल्यूएएमने शुक्रवारी या संदर्भात माहिती दिली आहे. राष्ट्रपती व्यवहार मंत्रालयानेही राष्ट्राध्यक्षांच्या निधनाला दुजोरा दिला आहे. शेख खलिफा यांच्या निधनावर जगभरातून लोकांनी शोक व्यक्त केला आहे. (india declaire national mourning because uae president death)

आता युईच्या राष्ट्राध्यक्षांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. त्यामुळे शनिवारी देशभरात राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केलं आहे. त्यामुळे खाजगी आणि सरकारी इमारतींवर अर्ध्यावर राष्ट्रध्वज फडकवण्यात येणार आहे. तसेच सरकारी मनोरंजनाचे कार्यक्रमही होणार नाही.

२०१९ मध्ये, शेख खलिफा चौथ्यांदा पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी निवडून आले. युएईच्या सर्वोच्च परिषदेने त्यांची पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड केली. शेख खलिफा यांनी ३ नोव्हेंबर २००४ पासून संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक म्हणून पदभार स्वीकारला. शेख खलिफा यांना त्यांच्या वडिलांचा उत्तराधिकारी म्हणून निवडण्यात आले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेख खलिफा हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार, शेख खलिफा यांच्या निधनानंतर यूएईमध्ये राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे. युएईमध्ये ४० दिवसांची राष्ट्रीय सुट्टी असणार आहे. या दरम्यान ध्वज अर्धवट राहील.

शेख खलिफा यांचा जन्म १९४८ मध्ये झाला होता. ते संयुक्त अरब अमिरातीचे दुसरे राष्ट्रपती आणि अबू धाबीचे १६ वे शासक होते. शेख खलिफा हे त्यांचे वडील शेख झायेद यांचे ज्येष्ठ पुत्र होते. शेख राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर फेडरल सरकार आणि अबू धाबी सरकारची पुनर्रचना करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूएईच्या राष्ट्राध्यक्षांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. मोदी म्हणाले, महामहिम शेख खलिफा बिन झायेद यांच्या निधनाबद्दल कळल्यानंतर मला खूप दुःख झाले. ते एक महान आणि दूरदर्शी नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत-युएई संबंध अधिक समृद्ध झाले. भारतातील लोकांच्या संवेदना यूएईच्या लोकांसोबत आहेत. त्याच्या आत्म्याला शांती लाभो.

तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही युएई राष्ट्राध्यक्षांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राहुल गांधी म्हणाले की, शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांच्या कुटुंबियांशी आणि युएईमधील लोकांप्रती माझ्या संवेदना आहेत. युएईमध्ये झपाट्याने वाढलेले दूरदर्शी नेते म्हणून ते स्मरणात राहतील.

महत्वाच्या बातम्या-
केतकी चितळेचा पाय खोलात! पवारांविषयी केलेली ‘ती’ पोस्ट पडणार महागात; पोलिस स्टेशनमध्ये…
..तर तुमचा आदित्य वरळीतच कायमचा मावळला असता; मनसेने सेनेला उपकारांची आठवन दिली करून
हनुमानजींचा कॉपी आहे ‘थॉर’ तर कर्णचा कॉपी आहे ‘आर्यनमॅन’, कंगनाने मांडली विचित्र थेअरी

ताज्या बातम्या आंतरराष्ट्रीय राजकारण

Join WhatsApp

Join Now