Share

हार्दिकने पृथ्वीकडे, तर पृथ्वीने ‘या’ वृद्ध काकांकडे सोपवली ट्रॉफी; विजयानंतर टीम इंडियाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल

अहमदाबादमध्ये न्यूझीलंडला हरवून टीम इंडियाने टी-20 क्रिकेटमध्ये आपला दबदबा कायम ठेवला. 1 फेब्रुवारीला झालेल्या सामन्यात टीम इंडियाने शानदार पुनरागमन केले. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक ते क्षेत्ररक्षणापर्यंत सर्व काही यजमान संघाच्या दिशेने जाताना दिसले.

नाणेफेक जिंकून मेन इन ब्लू संघाने 4 गडी गमावून 235 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात, ब्लॅककॅप्स लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयशी ठरले. परिणामी भारताने निर्णायक सामना 168 धावांनी जिंकून मालिका जिंकली. या विजयाचा आनंद साजरा करताना भारतीय खेळाडू खूप आनंदी दिसत होते. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

1 फेब्रुवारीला न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारतीय संघ पूर्णपणे विरोधी संघावर वर्चस्व गाजवताना दिसला. प्रथम फलंदाजी करताना भारताला 4 गड्यांच्या मोबदल्यात 235 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते, ते साध्य करण्यात किवीज अपयशी ठरले.

परिणामी यजमानांनी 168 धावांनी ऐतिहासिक विजय नोंदवला. या विजयासह संघाने मालिका 2-1 अशी खिशात घातली.  सामना संपल्यानंतर सर्व खेळाडू एकमेकांना हस्तांदोलन करताना आणि मिठी मारताना दिसले.

गिलने गेल्या महिन्यातच श्रीलंकेविरुद्ध पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. या सामन्यापूर्वी त्याने साधे अर्धशतकही ठोकले नव्हते. शुभमन गिलच्या शतकाच्या जोरावर भारताने न्युझीलंडला तब्बल २३५ धावांचे लक्ष्य दिले होते. शुभमन गिलने 54 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

या खेळीत त्याने १० चौकार आणि ५ षटकार मारले. त्याने चौकारांच्या मदतीने आपले शतक पुर्ण केले. त्याने ३५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते मात्र नंतर त्याने जोरदार कमबॅक केला. यानंतर गिलने वेगवान धावा करण्यास सुरुवात केली. याआधी त्याने देशांतर्गत टी-२० मध्ये केवळ एकच शतक झळकावले होते.

नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि मिचेल सँटनरने मायकेल ब्रेसवेलला दुसरे षटक देऊन मास्टर स्ट्रोक खेळला. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर इशान किशनला एलबीडब्ल्यूवर बाद केले.

त्यानंतर राहुल त्रिपाठीनेही २२ चेंडूत ४४ धावा ठोकल्या. त्याने फर्ग्युसनला लागोपाठच्या चेंडूंवर एक चौकार आणि एक षटकार ठोकला. त्याने गिलसोबत दुसऱ्या विकेटसाठी ४२ चेंडूत ८० धावा जोडल्या. न्यूझीलंडची सुरुवात खुपच खराब झाली. हार्दिक पंड्याने पहिल्याच षटकात फिन ऍलनला बाद केले.

त्याचवेळी ट्रॉफी मिळाल्यानंतर पंड्या संघाकडे धावला आणि युवा फलंदाज पृथ्वी शॉकडे ट्रॉफी दिली. संघाच्या सेलिब्रेशन दरम्यान, भारतीय कर्णधाराने विजयाच्या सेलिब्रेशनमध्ये सपोर्ट स्टाफच्या एका सदस्याचा समावेश करण्यासाठी उदारता दाखवली.

त्यानंतर सर्व खेळाडूंनी फोटोसाठी पोझ दिली. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्याला चाहत्यांनी पसंती दिली आहे. पहा टीम इंडियाच्या विजयाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ

https://twitter.com/ManviNautiyal/status/1620835078229336064?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1620835078229336064%7Ctwgr%5Ed1d62e653e81705d81bff8b538f0fffab3d20be7%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket%2Fhardik-pandya-handover-trophy-to-prithvi-shaw-after-series-win-team-india-celebration-video-goes-viral%2F

महत्वाच्या बातम्या
“जेव्हा ‘तुम्ही देशासाठी खेळता तेव्हा..’, शुबमन गिलने सामन्यानंतर ठेवला देशभक्तीचा आदर्श, ‘या’ वक्तव्याने जिंकली मने
न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याला चढला घमंड; म्हणाला शुभमन नव्हे तर मी स्वत:च आहे हिरो
शुभमन गिलचे शतक आणि गोलंदाजांचा जलवा, भारताचा न्युझीलंडविरूद्ध सर्वात मोठा विजय 

खेळ ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now