Share

Team india : भारतानं हरवलं ऑस्ट्रेलियाला पण मिरची लागली पाकिस्तानला, वाचा काय घडलं..

Team india | भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव करत तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. 187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने एक चेंडू बाकी असताना 4 गडी गमावून विजय मिळवला. विराट कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले.

कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 33 वे अर्धशतक पूर्ण केले. तर दुसरीकडे सूर्यकुमार यादवने 69 धावा करून भारताला विजयाचा रस्ता दाखवला. हैदराबादमध्ये नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघासमोर निर्धारित षटकांत सात गडी गमावून 187 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

ऑस्ट्रेलियन संघासाठी, मधल्या फळीतील स्फोटक फलंदाज टिम डेव्हिडने 200.00 च्या स्ट्राइक रेटने 27 चेंडूत 54 धावापैकी सर्वोच्च अर्धशतक झळकावले. याशिवाय संघासाठी डावाची सुरुवात करताना कॅमेरून ग्रीनने अवघ्या 21 चेंडूत 247.61 च्या स्ट्राईक रेटने 52 धावांचे योगदान दिले.

त्यांच्याशिवाय तिसरा सर्वाधिक धावा करणारा अष्टपैलू डॅनियल सॅम्स होता. त्याने संघासाठी 20 चेंडूत 28 धावांची नाबाद खेळी खेळली. तिसऱ्या टी-20 सामन्यात अक्षर पटेल हा भारतासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. अक्षरने 4 ओव्हरमध्ये सर्वाधिक 3 बळी घेतले.

T20 क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी एकूण 20 सामने जिंकले होते, तर यावर्षी 9 महिन्यांत टीम इंडियाने 21 सामने जिंकून पाकिस्तानचा हा विश्वविक्रम मोडला आहे. ऑस्ट्रेलियाला हरवून भारताने ही कामगिरी केली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या चाहत्यांना मिरची लागली आहे.

सूर्यकुमारने 36 चेंडूंत पाच चौकार आणि पाच षटकारांसह 69, तर कोहलीने 48 चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांसह 63 धावा केल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी करून भारताला विजयाच्या जवळ नेले आणि 20 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर हार्दिकने चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला.

महत्वाच्या बातम्या
Tanaji Sawant : ‘दोन वर्षे गप्प होता पण सत्तांतर झाल्यावर तुम्हाला लगेच आरक्षणाची खाज सुटली’
uddhav thackeray : उद्धव ठाकरेंवर अशीही निष्ठा, दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांचे परफेक्ट प्लॅनिंग; घेतला मोठा निर्णय
Bachchu Kadu : ‘संजय शिरसाटांची गुवाहाटीच्या तर बच्चू कडूंची सुरतच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन’
Rajasthan : राजस्थानात हायहोल्टेज ड्रामा! ९२ आमदारांची राजीनाम्याची धमकी, काॅंग्रेस आणखी एक राज्य गमावणार?

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now