Share

मला आपल्याशी बोलायचंय.., उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या एकमेव अपक्ष माजी मंत्र्याने दिले आमंत्रण

udhav thackeray

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड करत अख्ख ठाकरे सरकार धोक्यात आणलं. या काळात अनेक जवळच्या व्यक्तींनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. अन् शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला.

मात्र असं असलं तरी देखील काही व्यक्ति असे आहेत की, त्यांनी या कठीण काळात देखील उद्धव ठाकरेंची साथ सोडलेली नाहीये. त्यातीलच एक नाव म्हणजे, अपक्ष आमदार आणि माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख. सत्ता जाऊन देखील शंकरराव गडाख यांनी शिंदे गटात सामील न होण्याचा निर्णय घेतला.

आज ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठपणे सोबत आहेत. शिंदे यांनी बंड केल्यापासून राज्यात अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. अनेक आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. मात्र या सर्व घडामोडींमध्ये गडाख शांत होते. ते ठाकरे यांच्यासोबत असले तरी त्यांनी कोणतेही जाहीर वक्तव्य केले नव्हते.

मात्र आता त्यांची एक फेसबुक पोस्ट तूफान व्हायरल होतं आहे. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर गडाख यांनी कार्यकर्त्यांची संवाद साधायचा मानस व्यक्त केला आहे. ‘मला आपल्याशी बोलायचंय..!,’ फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी हे जाहीर केलं आहे.

यामुळे शांत असलेले गडाख आता नेमकं बोलणार काय? याकडे राजकीय वर्तुळाहे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाकडून गडाख यांना संपर्क झाला होता. मात्र, ते तिकडे गेले नाहीत, असेही बोलण्यात येते आहे. मात्र त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही.

काय आहे गडाख यांची फेसबुक पोस्ट..?
मला आपल्याशी बोलायचंय..!नमस्कार, गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या घटना, त्यातूनन झालेले आरोप-प्रत्यारोप, सध्या निर्माण झालेल्या राजकीय घडामोडीवर मला आपणा सर्वांशी संवाद साधायचा आहे. सोमवारी ११ जुलै २०२२ रोजी सकाळी ९.३० वाजता मुळा पब्लिक स्कूल, सोनई येथे आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती, असे आवाहन त्यांनी या पोस्टमध्ये केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
रामचरणच्या पत्नीने आई न होण्याचा निर्णय घेतल्यानंतर अध्यात्मिक गुरू म्हणाले, मानव ही लुप्त होणारी किंवा..
एकनाथ शिंदेंची गोची! ‘हा’ आमदार भ्रष्टाचारी; मंत्रीपद देऊ नका; थेट अमित शहा यांना लिहिणार पत्र
मानलं गड्या! ९ कोटींची नोकरी सोडून ‘या’ पोरीने घेतला संन्यास, कारण वाचून कौतुक कराल
काय चाललंय काय? राष्ट्रपती भवनाच्या स्विमिंग पुलमध्ये आंदोलकांची मस्ती, भवनाच्या बेडरूममध्ये..

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now