महाविकास आघाडी सरकारमधील बड्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या (Central Investigative Agencies) एकामागून एक धाडी टाकण्याचे सत्र सुरूच आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप विरुद्ध शिवसेना यांच्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे.
भाजपाकडून या कारवाईचं समर्थन केलं जात असून महाविकास आघाडीकडून कारवाईचा निषेध केला जात आहे. अशातच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी असलेल्या राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली आहे.
यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मुंबईत वांद्रे येथील अल्मेडा इमारतीत राहुल कनाल यांचं निवासस्थान आहे. सकाळपासून त्यांच्या इमारतीबाहेर केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात असून आयकर विभागाकडून कनाल यांच्या घरावर धाडसत्र सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
तसेच राहुल कनाल हे घरी आहेत की, नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही. तसेच हे धाडसत्रं किती दिवस चालेल याचीही काही माहिती समोर आलेली नाहीये. याचबरोबर करण्यात आलेली छापेमारी कोणत्या प्रकरणाशी निगडीत आहे, यामागचे कारण देखील स्पष्ट झालेले नाहीये.
मात्र कनाल यांच्या इमारतीखाली सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला आहे. तर दुसरीकडे आज दुपारी शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं जाहीर केलं आहे.
परंतु त्यापूर्वीच शिवसेना नेत्याच्या घरी आयकर विभागाने धाड मारल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून हे दिल्लीचं महाराष्ट्रावर आक्रमण असल्याचं ते म्हणाले. ‘गेल्या काही महिन्यांमध्ये जेव्हा इथे निवडणुका लागतील असं समजलं आणि ठाकरे सरकारची भाजपाला भीती वाटायला लागली, तेव्हापासून हे सुरू आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
गप्प बसलात तर तुम्हाला राष्ट्रपती करू म्हणाले होते पण मी.., मोदी सरकारबाबत मलिकांचा खळबळजनक खुलासा
‘आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट’; महेश टिळेकरांचा मराठी कलाकारांना टोला
जर्मनीनेही केले भारताचे तोंडभरून कौतुक; म्हणाले, भारताची डिप्लोमेसी शानदार, त्यांना माहिती आहे की..
अनुपम खेर यांचे शर्टलेस फोटो व्हायरल; फिटनेसच्याबाबतीत अनिल कपूर यांनाही देताहेत टक्कर