राज्यभरात सध्या धाडसत्र सुरु आहे. आयकर विभागाकडून वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या जात आहे. आता आयकर विभागाने देशातील प्रसिद्ध हिरानंदानी ग्रुपवर छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. हिरानंदानी ग्रुपवर छापा टाकल्याची बातमीमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. (income tax department raid on hiranandani group)
आज सकाळी मुंबई, बंगळुरु, ठाण्यासह देशात एकूण २४ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे. ठाण्यात हिरानंदानी ग्रुपवर आयकर विभागाने छापा टाकल्याचे समोर आले आहे. कोट्यवधींची कर चोरी प्रकरणातून या धाडी टाकण्यात आलेल्या आहे.
हिरानंदानी ग्रुपने रियल स्टेटमध्ये काळा पैसा गुंतवल्याचा संशय आहे. हिरानंदानी ग्रुपवर छापा टाकल्यामुळे बांधकाम क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. पुणे आणि ठाण्यातील युनिकॉर्न स्टार्ट अप्स ग्रुपची कार्यालये आणि संबंधित जागांवर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ९ मार्च २०२२ रोजी हे छापे घातले होते.
हि कंपनी बांधकाम साहित्याचा घाऊक आणि किरकोळ पुरवठा करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी देशभरात प्रसिद्ध असून या कंपनीची वार्षिक उलाढाल ६००० कोटींपेक्षा जास्तीची आहे. आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात एकूण २३ ठिकाणी हे छापे टाकण्यात आलेले आहे.
या छापेमारीत आयकर विभागाला महत्वाचे पुरावे सापडले आहे. त्यामध्ये कागदपत्रे आणि डिजिटल डेटाचा समावेश आहे. त्यामुळे ते सर्व पुरावे जप्त करण्यात आले आहे. या पुराव्यांवरुन या कंपनीने अनेक बनावट खरेदी, बेहिशेबी रोखीचे व्यवहार केले आहे.
तसेच या पुराव्यांवरुन साधारण ४०० कोटींच्या गैरव्यवहाराची नोंद आढळली आहे. याबाबत आयकर विभागाने कंपनीच्या संचालनाकडेही विचारणा केली आहे. त्यावर अशाप्रकारे गैरव्यवहार केल्याची कबूलीही त्यांनी दिली आहे. तसेच २२४ कोटी बेहिशोही उत्पन्न मिळाले, असेही त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
विधानसभा निवडणूकीत दमदार कामगिरी अन् आमदाराला लागली राज्यसभेची लॉटरी; बनणार सर्वात तरुण सदस्य
‘या’ महिला क्रिकेटरने मध्यरात्री जडेजासाठी केले होते १२ ट्विट; म्हणाली, ‘उद्या सकाळी पुलमध्ये भेटू’
RRR मोडणार सर्व रेकॉर्ड? चित्रपटाचा पहिला रिव्ह्यु आला; पाहणारा म्हणाला, ‘हा चित्रपट आग लावणार’