Share

शाळेत येताच विद्यार्थीनी रडू लागल्या अन् बेशुद्ध पडल्या; उपायासाठी बोलावले मांत्रिकाला

उत्तराखंडच्या बागेश्वर जिल्ह्यातील रायखोली ज्युनियर हायस्कूलमधील काही विद्यार्थिनींसोबत एक खळबळजनक प्रकार घडला आहे. या शाळेतील काही विद्यार्थींनींनी अचानक आरडाओरडा सुरु केला. त्यानंतर रडत रडत त्या बेशुध्द पडल्या. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला आहे.

विद्यार्थ्यांना पाहून शिक्षक आणि शाळेतील इतर कर्मचारीही भयभीत झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना शांत करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ते शांत होत नव्हते. त्यानंतर शिक्षकांनी पालकांना शाळेत बोलवून विद्यार्थिनींना त्यांच्या घरी पाठवले.

या घटनेला मास हिस्टेरिया असे म्हटले जाते. मास हिस्टेरिया म्हणजे सामूहिकरीत्या एका विशिष्ट प्रकारची कृती करणे. तज्ज्ञांच्या मते, मास्क हिस्टेरिया ही एक मानसिक समस्या आहे. मानसिक तणावामुळे याची शारीरिक लक्षणं दिसून येत असतात.

गुरुवारी या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने वैद्यकीय पथक पाठवून विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले. व्हिडिओमध्ये जवळपास सहा विद्यार्थिनी जमिनीवर बसलेल्या आणि पडलेल्या आहेत. तसेच त्या ओरडताना दिसत आहेत.

या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. या परिस्थितीमध्ये मदत करण्यासाठी सुरुवातीला एका मांत्रिकाला बोलावण्यात आले होते. या सर्व प्रकारामुळे शाळेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच शाळेला भुताने पछाडले असल्याच्या अफवा सर्वत्र पसरत आहेत.

या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. अशा अफवा पसरत आहेत की शाळेत भुत आहे. भुताला पळवण्यासाठी मांत्रिकालाही बोलावण्यात आले होते. पण ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. जेव्हा सत्य लोकांच्या समोर आले तेव्हा त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

महत्वाच्या बातम्या
Aditya thackeray: भाषण करताना अचानक सुरू झाली अजान, आदित्य ठाकरे म्हणाले, मला वाटतं दोन मिनिटं…
राज्यपालांचं विधान राज्याचा अपमान करणार, केंद्र सरकारकडं आम्ही तक्रार करणार; शिंदे गट आक्रमक
साऊथचा हा सुपरस्टार बनणार जेम्स बॉन्ड, अभिनय पाहून अनेक हॉलिवूड सेलिब्रीटी खुश
राज्यपालांच्या समर्थनासाठी धावून आल्या चित्रा वाघ; म्हणाल्या ‘१७ सेकंदात २७ शिव्या देणारे…

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now