परतीच्या पावसाने सध्या पुर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजवला आहे. मराठवाड्यासह औरंगाबादमध्ये लोकं या पावसाला त्रासले आहेत आणि सगळीकडे पाणी पाणीच साचले आहे. या पावसाने मृतदेहाचीही हेंडसाळ केलेली एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे.
कन्नड तालुक्यातील नाचनवेलजवळ आमदाबाद येथे एक धक्कादायक घटना घडली. आमदाबाद येथे असलेल्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाही. रस्ता नसल्याने ग्रामस्थांनी अंजना नदीच्या पात्रात सर्वात उंच ठिकाणी एका महिलेच्या मृतदेहाला अग्निडाग दिला. पण त्यानंतर एक तास धो धो पाऊस झाला.
पाऊस झाल्याने नदीच्या पात्रातील पाणी वाढले. पाणी वाढल्याने महिलेच्या चितेला नदीच्या पाण्याने घेरले. चितेच्या चारही बाजूने पाणी वाहत होते. मृतदेह अर्धवट जळत असल्याचे पाहून लोकांनी शेवटी टायर आणून अंत्यसंस्कार केले. दर पावसाळ्यात आमदाबाद येथील लोकांची अशीच अवस्था होते.
अनेकवेळा नागरिकांनी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली पण त्यांची मागणी पुर्ण झाली नाही. चितेच्या अग्निडागासाठी मुलभूत सुविधाही मिळणे कठीण झाले आहे. दर पावसाळ्यात ही समस्या उद्भवते. शांताबाई गोटीराम बनकर यांचे मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी ही घटना घडली.
अंत्यसंस्कार करत असताना जळणाऱ्या चितेला अचानक पुराच्या पाण्याने वेढले. नदी गावाजवळून वाहते त्यामुळे नदीला खुप पाणी होते. ग्रामस्थांकडे दुसरीकडे चिता नेण्याचा पर्याय नव्हता. ग्रामस्थांना मोकळ्या जागी अंत्यसंस्कार करता येत नाहीत.
नदीपात्रात उंच जागा पाहून नागरीक आपल्या नातेवाईकांचे अंत्यसंस्कार करतात. पण नेमकी पावसाळ्यात त्यांना त्रास सहन करावा लागतो. अंत्यसंस्कारही नीट करता येत नाही. स्मशानभूमीला मंजूरी मिळाली आहे पण अजूनही काम पुर्ण झाले नाही. आमदाबादची लोकसंख्या १५०० च्या आसपास आहे.
आमदार निधीतून स्मशानभूमीचे काम जून २०२२ मध्ये मंजूर झाले होते. नदीचे खोलीकरण झाल्यानंतर रस्ता वाहून गेला. ग्रामस्थांना गावातील मोकळ्या शेतात अंत्यसंस्कार करता येत नाहीत त्यामुळे स्मशानभूमीचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी गावकरी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
Uddhav thackeray : ढुंगणावर आपटण्यापेक्षा पळालेलं बरं म्हणून ते पळाले, अंधेरी पोटनिवडणूकीवरून ठाकरेंचा भाजपला टोला
Eknath shinde : मुख्यमंत्री शिंदेंना निवडणूकीत पाडू शकतो अशा माणसाची शिवसेनेत घरवापसी; शिंदेंची चिंता वाढली
Guru Jaggi Vasudev : बाळांनो फटाके फोडा, ज्यांना प्रदूषणाचा त्रास होतोय त्यांनी ऑफिसला पायी जावे- गुरू जग्गी वासुदेव
Pune : लाडक्या बहीनीचे शेवटचे दर्शनही झाले नाही; थरथरत्या हातांनी चितेवरच ठेवली माहेरची साडी