जातीय संघर्षाचा पाया घालणाऱ्या आणि हिंदू-मुस्लिम यांच्यात भेद निर्माण करणाऱ्यांविरोधात एक उदाहरण म्हणून बिहारमधील नालंदा जिल्हा एक आदर्श म्हणून समोर आला आहे. नालंदा जिल्ह्यातील बेन ब्लॉकमधील माडी गावातील लोकांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याचे असे उदाहरण घालून दिले आहे, जे पाहून पुर्ण देश आश्चर्यचकित झाला आहे.
वास्तविक तिथले हिंदू धर्माचे लोक मुस्लिम समाजाच्या मशिदीची देखभाल करतात आणि तिची पुर्ण काळजी घेतात. त्याचबरोबर या मशिदीमध्ये टेपरेकॉर्डरच्या माध्यमातून पाच वेळा अजान दिली जाते. ज्याची जबाबदारी गावातील हिंदू बांधवाच्या हाती आहे.
नालंदा जिल्ह्यातील बेन ब्लॉकमधील माडी गावात मुस्लिमांचे एकही घर नाही. पण, दररोज पाच वेळा अजान असते. हिंदू बांधवांना अजान कशी द्यायची हे कळत नाही म्हणून ते पेन ड्राईव्हची मदत घेतात. मशिदीचे रंगरंगोटी असो वा बांधकाम असो, गावातील लोक सहकार्य करतात.
मशिदीच्या स्वच्छतेची जबाबदारी गौतम महतो, अजय पासवान, बखोरी जमादार आणि इतरांवर आहे. गावकऱ्यांची मशिदीवर नितांत श्रद्धा आहे. घरातील लग्न असो किंवा कोणताही आनंदाचा प्रसंग, सर्वप्रथम हे सगळे लोक मशिदीला भेट देतात. असे न करणाऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागेल असे मानले जाते.
शतकानुशतके चालत आलेली ही परंपरा लोक पाळत आहेत. मशिदीच्या बाहेर एक कबरही आहे. यावरही लोक चादरीचे आच्छादन करतात. पूर्वी गावात वारंवार आगीच्या घटना आणि पूर येत असे. सुमारे 500 ते 600 वर्षांपूर्वी हजरत इस्माईल गावात आले. त्यांच्या आगमनानंतर गावात कुठलीही नासधूस झाली नाही.
ते गावात आल्यानंतर आगीच्या घटना थांबल्या. काही दिवसानंतर त्यांचा मृत्यु झाला. हजरत इस्माईल यांच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी त्यांना मशिदीजवळ दफन केले. 1942 च्या जातीय दंगलीनंतर सर्व मुस्लिम कुटुंबे गाव सोडून पळून गेले. तेव्हापासून मशिदीची देखभाल हिंदू बांधव करत आहेत. ही मशीद सुमारे 200 वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. जेव्हा नालंदा विद्यापीठ होते, तेव्हा तिथे बाजारपेठ असायची. त्यामुळे गावाचे नाव मंडी पडले. त्यानंतर या गावाचे नाव माडी असे पडले.
महत्वाच्या बातम्या
२४% व्याजाने पैसे देणाऱ्या LIC किंगच्या घरावर छापा, कोट्यावधींच्या घबाडासह १०० तोळे सोने जप्त
पुण्याच्या उद्योगक्षेत्राला मोठा धक्का! प्रसिद्ध ‘प्रवीण मसाले’चे संस्थापक हुकमीचंद चोरडिया यांचे निधन
गाण्याचे शिक्षण घेतले नाही तरी केले ३५०० हून अधिक गाण्यांवर काम, वाचा केकेच्या न ऐकलेल्या गोष्टी
कोल्हापूरच्या आकाशात उडणारी ‘ती’ वस्तू म्हणजे एलिएन्स? व्हिडीओ पाहून लोकं म्हणतात…