शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे(Sheetal Mhatre) आणि शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एडिट करून त्यावर अश्लील मजकूर लिहून तो सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे. या प्रकरणात आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उडी घेतली आहे.
हा व्हिडिओ मातोश्री नावाच्या फेसबुक पेजवरून अपलोड करण्यात आल्याचं तक्रारीत सांगितला आहे. याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर अज्ञात व्यक्तींवर विनयभंगासारखा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे.
या प्रकरणात ठाकरे गटाचा हात असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत ४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्यातील एक व्यक्ती आमदार आदित्य ठाकरेंच्या जवळची असल्याचे सांगितले जात आहे. आता यावरून ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगताना दिसत आहे.
दरम्यान, शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओप्रकरणी अधिवेशनात गदारोळ झाला होता. एकीकडे शीतल म्हात्रे यांनी या व्हायरल व्हिडिओप्रकरणी ठाकरे गटावर आरोप केले आहेत. यावर ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला आहे.
अधिवेशनात बोलताना ते म्हणाले, “एका आमदाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. याप्रकरणी निरपराध लोकांवर कारवाई केली जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. हा व्हिडीओ मॉर्फ केलेला आहे की ओरिजिनल आहे हे माहीत नाही. पण आमदार मुलाच्या फेसबुक पेजवरून का डिलीट करण्यात आला. याची चौकशी व्हायला हवी, असेही दानवे म्हणाले आहेत.
तसेच, मी सुद्धा १० लोकांना पाठवला. यूट्यूबवर आतापर्यंत ३० लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. पोलिस विनाकारण लोकांवर कारवाई करतात. तसेच पोलिसांनी त्या मुलाच्या फेसबुक व्हिडिओची चौकशी करावी. हा व्हिडिओ मॉर्फ आहे की खरा, हे त्या व्हिडिओवरूनच समजेल, असेही अंबादास दानवे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
‘मुलाने हे शिंदेगटात प्रवेश करणे हे माझ्यासाठी..’; सुभाष देसाईंची धक्कादायक प्रतिक्रीया
15 कोटींसाठी केला अभिनेते सतीश कौशिक यांचा खून, फार्महाऊसच्या मालकानेच केला घात
फक्त ७५ घरे असलेल्या ‘या’ गावाने देशाला आजवर दिलेत ४७ IAS आणि IPS अधिकारी; वाचा त्या गावाची भन्नाट स्टोरी