आज अचानक या राजकीय वर्तुळात एमआयएमची एंट्री झाली आहे. महाविकास आघाडी सरकारसोबत MIM ने निवडणूक लढवायची तयारी दर्शवली आहे. यावरून संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण आज ढवळून निघत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी राज्यातील राजकारणातील या नव्या समीकरणाचे सूतोवाच केले.
ओवैसी यांच्या MIM नं महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी करण्याची तयारी केली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यामाध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांपर्यत निरोप पोहोचवा अशी विनंती केली आहे.
याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना एमआयएमसोबत उघड किंवा छुपी हातमिळवणी होऊ शकत नाही हे स्पष्ट केले आहे. ‘औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे कोणीही असतील ते महाराष्ट्राचे शिवसेनेचे आणि महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षाचे आदर्श होऊ शकत नाही. त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची उघड किंवा छुपी आघाडी होऊ शकत नाही, असे राऊत म्हणाले.
दरम्यान, औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत आघाडी कशी होऊ शकते? तुम्ही विचारच कसा करू शकता? असा विचार करणंच एक आजार आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं. तसेच महाराष्ट्रात तीन पक्षाचं सरकार आहे. चौथा त्यात येणार नाही. तीनच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यावर आता इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. “भारतात आणि महाराष्ट्रात राहणारा सर्व मुस्लीम समाज शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना आदर्श मानतो. त्यांची मक्तेदारी फक्त तुमची आहे हे विसरून जा,” अशा शब्दात इम्तियाज जलील यांनी सेनेवर तिखट शब्दात निशाणा साधला आहे.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, “तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग फक्त आपल्या राजकीय स्वार्थासाठी करता. औरंगजेब कोणत्या काळात होते आणि आजचा काळ काय आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं”, असं जलील म्हणाले. ज्या शिवसेनेचा जन्म काँग्रेसच्या विरोधात झाला होता, ती शिवसेना फक्त सत्ता उपभोगण्यासाठी पुन्हा त्यांच्यासोबतच जाऊ शकते, तर तुम्ही किती खालच्या पातळीवर गेला आहात, हे दिसतंय, असे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
संतापजनक! पती, मुलांसमोरच महिलेला निर्वस्त्र करुन गुंडांनी तिच्यावर केला सामूहिक बलात्कार
गोव्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसची मोठी खेळी, ‘या’ नेत्याच्या खांद्यावर सोपवली जबाबदारी
मराठी बिग बॉस विनर विशाल निकमचे नशीब पुन्हा चमकले, ‘या’ मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
‘त्यावेळी फारूक अब्दुल्ला नाही, तर राज्यपालांचं शासन होतं’; ‘द काश्मीर फाईल्स’ वर ओमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया