Imtiyaz Jaleel on aurangabad name | आपले जास्त आमदार असतानाही भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे. त्यामुळे अनेकांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केले होते. आपल्या राजकीय फायद्यासाठी भाजप हे करत असल्याचे अनेक नेत्यांनी म्हटले होते. आता औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी एक वक्तव्य केले आहे.
मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवणं हाच भाजपचा अजेंडा असल्याचे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. एकदा मुंबई महापालिका भाजपच्या हातात आल्यावर त्यांच्यासमोर दुसरं कोणतंही मोठं आव्हान नाहीये, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.
तसेच मुंबई महापालिकेवर सत्ता येताच भाजप शिंदे गटाला सोडेल. हा माझा अंदाज खरा ठरणार असून तुम्ही आजच हे रेकॉर्ड करुन ठेवा, असेही इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. भाजपवर टीका करताना त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यावरही निशाणा साधला आहे. गरज पडेल तेव्हा ते सेक्युलर होतात, असे जलील यांनी म्हटले आहे.
भाजप आणि शिंदे यांच्या गटावर बोलताना जलील म्हणाले की, भाजप फक्त शिवसेनेचा उपयोग करुन घेत आहे. मुंबई महापालिकेवर एक हाती सत्ता मिळवणं हाच त्यांचा उद्देश आहे. एकदा का मुंबईवर कब्जा मिळवला की ते शिंदे गटाला कुठे सोडतील हे कळणारही नाही.
तसेच भाजपला शिवसेनेत भांडणं लावायची होती. त्यांना शिवसेनेत दोन गट पाडायचे होते. त्यामध्ये भाजपला यश आलं आहे. यामुळे त्यांना मुंबई महापालिकेची सत्ता मिळणार आहे. त्यासाठीच त्यांनी शिवसेनेत भांडणं लावलीत, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.
तसेच औरंगाबाद महापालिकेचा पुढचा महापौर हा एमआयएमचाच होणार आहे, असे मोठे वक्तव्य सुद्धा जलील यांनी केले आहे. राजकीय स्वार्थासाठी शहराच्या नामांतराचा घाट घातला जातोय. त्यामुळे मुस्लिम जनता नाराज होत आहे. शहरातील लोक औरंगजेबाला फॉलो करत नाही, पण तो एक इतिहासाचा भाग आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे, असेही जलील यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
Rohit patil: रोहीत पाटलांपुढे भाजपचे दिग्गद गारद; सगळ्याच्या सगळ्या जागा जिंकत विरोधकांचे डिपाॅझीटही जप्त
मला विधानपरीषद नको, मुश्रीफांना पाडूनच आमदार होणार; घाटगेंनी थोपटले दंड
दीपक केसरकरांनी सांगितलं मुख्यमंत्री शिंदेंच्या आजारपणामागंच खरं कारण; म्हणाले..