Share

औरंगाबादच्या सभेपूर्वी इफ्तार पार्टीला येऊन जा; इम्तियाज जलील यांनी राज ठाकरेंना दिले आमंत्रण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता औरंगाबादमध्ये सभा घेणार आहे. औरंगाबाद शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर १ मे रोजी सभा घेण्याची घोषणा मनसेने केली होती. आता या सभेला पोलिसांनीही परवानगी दिली आहे. (imtiaz jaleel invite raj thackeray)

मनसेचे नेते या सभेची जय्यत तयारी करताना दिसून येत आहे. अशात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. सभा सुरु होण्यापूर्वी इफ्तार पार्टीला राज ठाकरेंनी येऊन जावे, असे जलील यांनी म्हटले आहे. यावेळी जलील यांनी राज ठाकरेंना एक प्रकारे इफ्तार पार्टीचे आमंत्रणच दिले आहे.

औरंगाबाद आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे की कोणताही सण साजरा करतो तेव्हा तो सर्वजण मिळून साजरा करतो. पोलिस आयुक्तांना शहरातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी आमची मदत लागणार असली तर करण्यास तयार आहोत, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांची जलील यांनी भेट घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते.

राज ठाकरेंची सभा औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा आहे. साडे सात वाजता त्यांची सभा आहे. त्यापूर्वी राज ठाकरेंनी हिंदू मुस्लिमसाठी एकतेसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे. हिंदू मुस्लिम एकत्र येऊन इफ्तार करु, असे जलील यांनी म्हटले आहे.

रमजानच्या महिन्याची प्रतिक्षा मुस्लिम व्यक्ती वर्षभर करत असतो. सर्व जातीधर्माच्या लोकांना त्यांच्या व्यवसायाचं काय होणार याची काळजी आहे. औरंगाबादच्या जनतेला माझं आवाहन आहे की, सर्वजण मिळून सोबत जाऊया. सर्व समाजातील ९९ टक्के लोकांना शांततेच्या मार्गानं जायचं असतं. १ टक्के लोकांवर पोलिसांनी नियंत्रण ठेवावं, असेही इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

तसेच औरंगाबदच्या जनतेनं कुठलिही भीती बाळगू नये. एका राजकीय पक्षाचे नेते येत आहेत. त्यामुळे चिंता करु नका. बाजारपेठेतील दुकानदारांना त्यांच्या मालाचं काय होणार याकडे चिंता लागली आहे. राज ठाकरे हे आमचे पाहुणे आहेत. ते दुश्मन नाहीत, असेही इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now