iit kanpur on corona wave | देशात पुर्णपणे कोरोनाचे वातावरण शांत झालेले आहे. कोणतेही बंधन आता राहिलेली नाही. पुन्हा आधीसारखी सुरुवात होताना दिसून येत आहे. असे असताना आता चीनमधून पुन्हा कोरोना पसरत असल्याच्या बातम्या येत आहे. चीनमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातल्याचे म्हटले जात आहे.
कोरोनाच्या नवा व्हेरिएंटचे जगातील अनेक देशात रुग्ण वाढत चालले आहे. भारतात देखील या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहे. अशात आयआयटी कानपूर ने यावर महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी तीन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाचीही अचूक भविष्यवाणी केली होती.
कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने एक बैठक बोलावली होती. या बैठकीत कोरोनावर काय काय उपाययोजना करता येईल याबाबत चर्चा होत होती. त्यानंतर केंद्राने जनतेला गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याच्या सुचना दिल्या आहेत.
तसेच केंद्राने राज्य सरकारांना खबरदारी घेण्याचे आदेशही दिले आहे. अशात यावर आयआयटी कानपूरने सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. यंदाच्या कोरोनाला घाबरण्याची काही गरज नाही, असे आवाहन त्यांनी केले आहे. आयआयटीचे प्राध्यापक मणींद्र अग्रवाल यांनी याबाबत वक्तव्य केले आहे.
भारतात ९८ टक्के लोकांची कोरोनाविरुद्ध लढण्याची नैसर्गिक शक्ती निर्माण झाली आह. देशात येणारी कोरोनाची लाट छोटी लाट असेल. त्यामुळे घाबरण्याची काही गरज नाही आणि काळजी करण्यासारखंही काही नाही, असे मणींद्र अग्रवाल यांनी म्हटले आहे.
तसेच नव्या वर्षाच्या पार्ट्या आणि लग्न समारंभ यांच्यावर बंदी घालण्याची काही गरज नाही. कोरोनाची लस शॉर्ट टर्मसाठीच सुरक्षा देते पण भारतात त्याची देखील गरज नाही. नाताळ आणि नव्या वर्षानिमित्त होणाऱ्या पार्ट्या सुरु ठेवण्यात काहीच हरकत नाही, असेही अग्रवाल यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
BJP : भाजपच्या फायटर आमदार मुक्ता टिळक यांचं ५९ व्या वर्षी निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
corona : देशात पुन्हा कोरोनाचा धुमाकूळ सुरू; तिसरी लाट येणार का? तज्ञ म्हणाले लाट तर येणारच, पण…
raj thackeray : वसंत मोरेंच्या नाराजीवर भडकले राज ठाकरे? म्हणाले, माध्यमांसमोर गरळ ओकू नका, नाहीतर…






