politics : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे गट यांच्यात थेट लढाई पाहायला मिळणार आहे. त्या जागेवर दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली. तर त्या विरोधात भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीमुळे थेट संघर्ष या दोघांमध्ये होताना दिसेल. दरम्यान उरणचे आमदार आणि भाजप नेते महेश बालदी यांनी थेट उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान दिलं आहे.
महेश बालदी २०१९ मध्ये इच्छुक होते. मात्र भाजप- शिवसेना युती असल्याने त्यांना तिकीट नाकारण्यात आले. बंडखोरी करत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकली. आता याच महेश बालदी यांनी उद्धव ठाकरेंना स्थानिक आमदारच काय, खुद्द उद्धव ठाकरे सुद्धा निवडणुकीला उभे राहिले तर मी त्यांना हरवून दाखवेल, अशा शब्दात ओपन चॅलेंज केलं आहे.
उरणमध्ये एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, ‘पैशांतून सत्ता सत्तेतून पैसा, हे थांबायला हवे. विरोध कायमच धर्म, पंथ, जात या गोष्टींबाबत तेव्हाच बोलत राहतात. जेव्हा त्यांचं कर्तृत्व फार नसतं. माझ्यावरही हेच आरोप करण्यात आले. मी बाहेरचा आहे. मी मराठी माणूस नाही. मात्र तरीही मी जिंकून दाखवलं आहे.’
‘आता तर माझ्यासोबत भाजपचे कमळ असेल, नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस असतील. त्यामुळे मला कशाचीही चिंता नाही. उद्धव ठाकरे मागच्या वेळी प्रचारादरम्यान दोन वेळा उरणमध्ये येऊन गेले. एकदा आदित्य ठाकरे येऊन गेले. पण तरीही त्यांना मला पराभूत करता आलं नाही. आता स्थानिक आमदार मनोहर भोईर सोडाच, खुद्द उद्धव ठाकरे जरी माझ्या विरोधात उभे राहिले. तरीही मी त्यांनाही हरवून दाखवेन, असे यावेळी आमदार बालदी म्हणाले.
उद्धव ठाकरेंवर घणाघाती आरोप करत आमदार बालदी पुढे म्हणाले, ‘तुमच्या मुलाला तुम्ही वरळी मतदारसंघातून आमदार केलं. त्यानंतर तीन लोकांना तुम्हाला विधान परिषदेत आमदारकी द्यावी लागली. तेव्हा कुठे तुमचा मुलगा आमदार झाला. आम्ही मात्र अंगाला माती लावत शेवटपर्यंत लढणारे भाजप कार्यकर्ते आहोत. त्यानुसारच आम्ही काम करत राहणार.’
पुढे ते म्हणाले, ‘मागील काही काळापासून आदिवासी पाड्यातील काही प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले असेल. मात्र यापुढे सर्वच समस्यांची दखल घेऊन त्यावर काम केले जाईल,’ असे आश्वासन त्यांनी यावेळी लोकांना दिले. मात्र आमदार बालदी यांनी ठाकरेंबाबत केलेल्या तिखट वक्तव्यावर शिवसेनेकडून कोणती प्रतिक्रिया येते? हे पहावे लागेल.
महत्वाच्या बातम्या-
Amit Thackeray : ….नाहीतर मी राजकारणात आलोच नसतो; अमित राज ठाकरे असं का म्हणाले
Death : ब्रेकिंग! पणन महासंचालक घोरपडेंचा मृतदेह दोन दिवसांनी नीरा नदीपात्रात सापडला; हत्येचं गुढ कायम
eknath khadse : …अन् खडसे पोलीस स्टेशनसमोरच झोपले, 16 तासांपासून आंदोलन सुरूच; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण