Share

…तर पवारसाहेब पंतप्रधान झाले असते; सुप्रिया सुळेंच्या व्यक्तव्याने उडाली खळबळ

supriya sule

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे राजकारणातील अतिशय हुशार नेते म्हणून ओळखले जातात. विरोधक देखील नेमही शरद पवारांचे कौतुक करत असतात. विशेष बाब म्हणजे, शरद पवारांनी आजपर्यंत राज्याचं चार वेळा मुख्यमंत्रीपद आणि केंद्रात कृषी तसंच संरक्षण मंत्री असा समृद्ध राजकीय प्रवास केला आहे.

याचबरोबर आजपर्यंत त्यांनी राज्याचं मुख्यमंत्री पद, केंद्रातलं कृषी आणि संरक्षण मंत्री पद भूषवलं आहे. मात्र पंतप्रधान पद त्यांना हुलकावणी देतं आहे. त्याहून विशेष बाब म्हणजे, पंतप्रधान पदाच्या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव आजही चर्चिलं जातं.

तर अशातच शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मोठं व्यक्तव्य केलं आहे. ‘शरद पवार जर काँग्रेसमध्ये असते तर ते आतापर्यंत पंतप्रधान झाले असते,’ असं मोठं वक्तव्य सुप्रिया ताई यांनी केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.

सुप्रिया सुळे यांनी हे विधान ‘झी मराठी’वरील एका कार्यक्रमात केलं आहे. कालपासून झी मराठीवर ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सुरू झाला आहे. कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या आल्या होत्या. या कार्यक्रमाचा सुत्रसंचालक आणि अभिनेता सुबोध भावे यानं सुप्रिया सुळे यांची मुलाखत घेतली.

या कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळे यांना कधीकधी आणि कधीच नाही, अशा दोन पाट्या देण्यात आल्या होत्या. या पाट्या त्यांना प्रश्नाचं उत्तर म्हणून दाखवायच्या होत्या. या कार्यक्रमात त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, शरद पवार काँग्रेसमध्ये असते, तर पंतप्रधान झाले असते असं वाटतं का? त्यावर सुळे यांनी कधी कधी ही पाटी दाखवली.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या या विधानाने आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत देखील भाष्य केलं आहे. जेव्हा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी शपथ घेतली, त्यावेळी तुमच्या घरातील वातावरण कसे होते? त्यावर सुप्रिया यांनी ‘त्यावेळी मी झोपेत होते,’ असं उत्तर दिलं.

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now