Share

भारताचे चीनसोबत युद्ध झाले तर रशिया कोणाची साथ देणार? बाकीच्या देशांची काय भूमिका असेल?

गेल्या दोन महिन्यापासून युक्रेन युद्ध स्थितीचा सामना करत आहे. मात्र अद्याप रशियाने मागार घेतलेली नाही. रशिया रोज युक्रेनच्या कोणत्या ना कोणत्या भागात हल्ले करताना दिसत आहे. यात रशियाच्या बाजूने फक्त चीनने पाठिंबा दर्शविला आहे. तर युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी अनेक युरोपियन देशांनी आवाज उठविला आहे.

यासगळ्यात भारत तटस्थ असलेला दिसून येत आहे. भारताचे जर चीनसोबतचे संबंध बिघडले तर रशियाही नाराज होईल त्यामुळे नक्की कोणाच्या बाजूने उभे राहिचे हा प्रश्न भारतासमोर उभा राहिला आहे. दुसरीकडे रशियाला चीनने पाठिंबा दिल्यामुळे रशियाची ताकाद आणखीन वाढली आहे.

युक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी चीनमध्ये जाऊन अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली होती. त्यामुळे आपण आखत असलेल्या सर्व गोष्टींची माहिती रशियाने चीनला दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. याकारणाने चीनने या युध्दाकडेही दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. राहिला प्रश्न भारत आणि चीनमध्ये युद्ध होण्याचा तर तेव्हा रशिया भारतालाच पाठिंबा देईल.

कारण की, रशियाची ओळख सध्या भारताचा मित्र देश म्हणून आहे. रशिया आणि भारताचे संबंध ही जुने आहेत. यामुळेच रशिया भारताच्या बाजूने वाईट काळात उभा राहू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याचा फायदा रशियालाच आहे. 1971 च्या काळात पाकिस्तानातील युद्धात रशियन नौदलाने यूएस सातव्या फ्लीट टास्क फोर्स 74 ला बंगालच्या उपसागरात जाण्यापासून रोखले होते.

त्यामुळे भारत पाकिस्तानवर मात करु शकला होता. जागतिक शक्ती संतुलनाच्या दृष्टीने पहायला गेले तर भारत रशियासाठी खूप महत्त्वाचा देश आहे. रशिया भारताला संरक्षण उपकरणे ही पुरवतो. ज्या पध्दतीने पाश्चिमात्य देश भारताला पाहताच त्याच पध्दतीने रशिया भारताला पाहतो.

सध्या युक्रेनवर हल्ला केल्यामुळे रशियावर इतर देश नाराज झाले आहेत. त्यांनी आपल्या देशाची बाजारपेठ रशियासाठी बंद केली आहे. याकारणाने रशिया भारताकडे मदतीच्या नजरेने पाहत आहे. आता भारतच रशियाचे नुकसान होण्यापासून वाचवू शकतो. जर भारताने रशियाकडे पाठ फिरवली तर याचा तोटा भारतालाही होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या
आईची माया! मुलाला स्कुटी घेऊन देण्यासाठी म्हताऱ्या आईने भीक मागून जमा केले ८० हजार, वाचून भावूक व्हाल
शिळ्या चपात्या फेकून देताय? त्याआधी वाचा शिळ्या चपात्या खाण्याचे आश्चर्यकारक फायदे
रात्रीच्या तापमानात वाढ झाल्याने पुरूषांना मृत्युचा धोका, संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर
महाराष्ट्रात एकहाती सत्ता मिळवण्यासाठी भाजपचा मास्टर प्लॅन, तीन शिलेदारांवर महत्वाची जबाबदारी

ताज्या बातम्या आंतरराष्ट्रीय

Join WhatsApp

Join Now