Share

राज्यात आता निवडणूका झाल्यास कुणाची सत्ता येणार? सर्वेतून धक्कादायक माहिती आली समोर

राजकारणात काहीही घडू शकतं. याचा प्रत्यय २०१९ नंतर महाराष्ट्राच्या जनतेला आलेला आहे. परंतु सध्या परिस्थिती पाहता एकनाथ शिंदे यांची बंडखोरी मग शिवसेना पक्षात फुट, महाविकास आघाडीचं सरकार जाऊन शिंदे गट आणि भाजपचे सरकार सत्तेत आलं. कोर्टात लढाई चालू आहे. पुन्हा निवडणुकीची वेळ आलीच तर काय होईल? याबद्दल वेगवेगळे ओपिनियन पोल समोर येत आहे. (If elections are held in the state now, who will come to power?)

एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या नेतृत्वातलं सरकार कोसळलं आणि त्या जागी एकनाथ शिंदे गट आणि भाजपने सरकार स्थापन केलं. परंतु एकनाथ शिंदे गटाविरोधात शिवसेनेने याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयात सुनावणी होणे बाकी आहे.

या पार्श्वभूमीवर इंडिया टीव्ही मॅटराईजच्या पोलनुसार मोठी माहिती समोर आली आहे. निवडणुका नव्याने झाल्या तर भाजपला चांगल्या संख्येने मतदान होऊ शकतं. जवळजवळ १३४ जागा भाजपला मिळू शकतात. परंतु स्पष्ट बहुमत मिळणार नाही.

भाजपासोबत युतीत असलेल्या शिवसेनेतील शिंदे गटाला देखील चांगला प्रतिसाद मिळू शकतो. ४१ जागांवर त्यांना विजय प्राप्त होऊ शकतो. मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील गटाला १८ जागांवर समाधान मानावे लागेल.

राष्ट्रवादी काँग्रेसला ४४ तर काँग्रेस पक्षाला ३८ जागा मिळू शकतात १३ जागा इतरांच्या वाट्याला जाऊ शकतात,अशी माहिती संबंधित पोलमधून समोर आली आहे.

सध्या राज्यातील राजकारणाची अस्थिर परिस्थिती पाहून निवडणुका लागल्या तर कोणाचं सरकार येणार? याविषयी सामान्य नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. इंडिया टीव्हीच्या या पोलमधून समोर आलेल्या माहितीने सर्वांना आश्चर्य वाटेल हे नक्की.

महत्वाच्या बातम्या-
ईडीच्या धाडीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रीया; ‘बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो..’
ईडीच्या धाडीनंतरही संजय राऊतांनी फोडली डरकाळी! ‘मरेण पण शरण जाणार नाही’
तुमच्या बापाची जहागीर आहे का? शिंदे गटात प्रवेश करताच रावसाहेब दानवेंनी खोतकरांना सुनावले

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now