Share

Sharad Pawar : २०२४ च्या निवडणूकीत भाजपला चितपट करायचं असेल तर.., शरद पवारांनी दिला गुरूमंत्र

pawar and modi

Sharad Pawar: शरद पवारांनी मंगळवारी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना देशातील सर्व विरोधी पक्षांना सत्ताधारी भाजप विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्षांनी भाजप विरोधात एकजुटीने निवडणुकीला सामोरे गेले तर चित्र बदलू शकते, असा आशावाद यावेळी पवारांनी व्यक्त केला.

तसेच काँग्रेस पक्षाच्या दिल्ली सरकारबाबतच्या आडमुट्या भूमिकेवर पण त्यांनी भाष्य केले. दिल्ली येथील आप सरकार २०२१ च्या मद्य धोरण अनियमिततेबाबत केंद्रीय तपास यंत्रणेला सामोरे जात आहे. या काळात अरविंद केजरीवालांच्या बाजूने काँग्रेसने समर्थन देणे आवश्यक आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.

पुढे बोलताना पवार म्हणाले, ‘आप पक्षाला काँग्रेसने साथ देणे गरजेचे आहे. काँग्रेसचे हे कर्तव्यच आहे. अरविंद केजरीवालांशी तुमचे मतभेद असतील. पण आपली खरी लढाई भाजपची आहे. जातीयवाद्यांशी आहे,’ अशा परखड शब्दात पवारांनी काँग्रेसला सुनावले.

भाजपवर निशाणा साधत पवारांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले. ‘भाजप नेते सांगतात एक आणि करतात वेगळंच, अशी स्थिती पूर्ण देशात आहे. महाराष्ट्रामध्ये पण भाजपचे सरकार नव्हते. पण एका गटाला सोबत घेऊन त्यांनी ते सरकार आणले. आज देशाच्या ७० टक्के भागात भाजप सरकार नाही. सर्व विरोधकांनी मनात आणले तर २०२४ मध्ये नकाशा बदलू शकतो,’ असं पवार म्हणाले.

महाराष्ट्रातील अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांच्यावरील कारवाईचा उल्लेख करत पवारांनी दिल्लीतील बड्या नेत्यांविरोधात मोठा कट रचला जात असल्याचे सांगितले. दरम्यान दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांची सीबीआय चौकशी झाली. यावेळी सिसोदियांनी पण सरकारी यंत्रणेच्या गैरवापराबाबत भाजपवर ताशेरे ओढले.

मनीष सिसोदिया यांची केस आता ईडीकडे सोपवली जाणार आहे. निवडणुकांच्या आधी ईडीची नोटीस त्यांना आली. याच प्रकारे पवारांना देखील महाराष्ट्रात निवडणुका होण्याआधी ईडीची नोटीस आली होती. हा योगायोग नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र शरद पवारांप्रमाणेच आपचे नेते सुद्धा बेधडकपणे या चौकशीला सामोरे जात असल्याचे दिसते.

महत्वाच्या बातम्या-
Raj Thackeray : राज ठाकरे भाजपचे प्रवक्ते, ते भाजपचीच तळी उचलतात, शिवसेनेची जहरी टीका
Strange incident : पार्टी करताना दारूच्या नशेत मित्रांनी गुप्तांगात टाकला ग्लास; वेदनांनी कळवळणाऱ्या तरूणाला शेवटी….
Ajit Pawar : अजितदादांच्या रागापुढे भाजपचे सगळे मंत्री पडले गार, एकाने तर सभागृहातून ठोकली धूम

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now