Share

हनिमूनच्या रात्रीचं पत्नीला कळालं IAS पतीचं ‘ते’ भयानक सत्य, तरी ३२ वर्ष गप्प बसून करत होती मुकाट्याने संसार

अनेकजण आपल्या प्रेमासाठी आणि कुटूंबासाठी काहीही करायला तयार असतात. पण अशा काही गोष्टींचा कधी कधी खुप वाईट परीणामही दिसून येतो. आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. उत्तर प्रदेश मध्ये एका आयएएस जोडप्याच्या बंद खोलीतील वाद आता जगजाहीर झाला आहे. आयएएस पत्नीने आपल्या आयएएस पतीविरोधात गुन्हा दाखल केला असून अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. लग्नाच्या तब्बल ३२ वर्षानंतर तिने हे आरोप केले आहे. (ias wife file case against husband)

आयएएस पत्नीने आयएएस पतीवर मारहाण करून लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप केला आहे. तसेच तिचा आयएएस पती शारीरिकदृष्ट्या अशक्त असून दुसऱ्या महिलेकडे जाण्याची धमकी देत होता, असेही तिने म्हटले आहे. पीडित आयएएस महिलेने शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस महिलेच्या आरोपांचा तपास करत आहेत.

पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत महिलेने आरोप केला आहे की, तिचा आयएएस पती शारीरिकदृष्ट्या अक्षम आहे आणि उलट तो तिच्यावर शारीरिक अक्षमतेचा आरोप करतो आणि तिला मारहाण करतो. महिला आयएएसचा आरोप आहे की तिचा पती तिला फक्त मारहाण करत नाही तर नेहमी दुसऱ्या महिलेकडे जाण्याची धमकी देतो. पतीच्या या शारीरिक दुर्बलतेमुळे तिचा संसार कधीच पूर्ण होऊ शकला नाही, असा आरोप महिला आयएएसने केला आहे.

महिला आयएएसने पतीवर पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोपही केला आहे. दाखल केलेल्या दाव्यात महिलेने आरोप केला आहे की, काही महिन्यांपूर्वी तिला आणि तिच्या आईला कोरोनाची लागण झाली होती, त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागले होते आणि यादरम्यान तिच्या पतीने तिच्या बँक खात्यातून २० लाख रुपये काढून घेतले होते.

तसेच पतीने डॉक्टरांना न दाखवता चुकीची औषधे देण्याचा प्रयत्न केला. लग्नानंतर इतक्या दिवसांनी असे आरोप करण्याच्या प्रश्नावर ती म्हणाली की, कुटुंब तुटण्यापासून वाचवण्यासाठी इतके दिवस त्रास सहन करत होते, पण आता हे प्रकरण तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले आहे.

या महिला आयएएस अधिकाऱ्याचे लग्न १९९० मध्ये झाले होते. तेव्हा हनीमुन दरम्यानच महिला अधिकाऱ्याला लक्षात आले होते की, तिचा पती शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही. पतीच्या या शारीरीक अक्षमतेमुळे तिला जबर धक्का बसला होता, पण संसार टिकवण्यासाठी तिने सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले. परंतू तिचा नवरा तिला सुखाने जगू देत नव्हता. तिला मारहाण करत होता, तसेच तिला धमक्या देत होता, त्यामुळे तिने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

महत्वाच्या बातम्या-
VIDEO: गर्लफ्रेंडला सुटकेसमध्ये टाकून हॉस्टेलच्या बाहेर पळवणाऱ्या तरुणाला पकडलं; लोक म्हणाले, रिस्क है तो इश्क है
“सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारू पितात, मी पुराव्यासह सिद्ध करायला तयार”
मुकेश अंबानींनी घेतली जगातील सगळ्यात सुरक्षित एसयूव्ही, किंमत वाचून तोंडात बोटं घालाल

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now