राज्यात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे सत्तापालट झालं. अडीच वर्ष सत्तेत असलेलं तीन पक्षांनी मिळून स्थापन केलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळल. याचा जास्त फटका शिवसेनेला बसला आहे. तब्बल 40 आमदारांनी शिंदे गटाला समर्थन दिल्याने शिवसेना मोठा धक्का बसला आहे.
चिंताजनक बाब म्हणजे, राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून मोठ्या प्रमाणात सेनेच्या नेत्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. मोजकेच आमदार आता उद्धव ठाकरेंसोबत आहेत. शिवसेनेला लागलेली गळती पाहता खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मैदानात उतरले आहेत.
उद्धव ठाकरेंसोबत त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे ही जोमाने कामाला लागले आहेत. जनतेपर्यंत पोहचण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी ‘निष्ठा यात्रेचे आयोजन केले आहे. तर उद्धव ठाकरेंकडून बैठकींचे सत्र सुरू आहे. नुकताच उद्धव ठाकरेंनी पुण्यातील शिवसैनिकांची भेट घेतली.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी पुण्यातील शिवसैनिकांची मन जिंकली. काल मातोश्री येथे पुणे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची व सर्व नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी बोलताना खुद्द उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी म्हंटलं की, ‘आता माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही परंतु तुम्हीची ताकद मला हवी आहे. सध्या तुम्हाला विदाऊट तिकीट प्रवास करावा लागणार आहे. लढायचे असेल तर सोबत राहा, भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे.’
दरम्यान, ‘बंडखोर आमदारांच्या विरोधात आता न्यायालयाचे दरवाजेही ठोठावणात असून अरुणाचल प्रदेश सारखा निकाल लागण्याची शक्यता असल्याचे देखील उद्धव ठाकरेंनी नमूद केलं. हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा, असे आव्हान ठाकरेंनी यावेळी दिले.
महत्वाच्या बातम्या-
कुठे निघालो होतो हे पत्नीलाही सांगितलं नव्हतं, मात्र.., शंभूराजे देसाईंनी सांगितला बंडखोरीचा ‘तो’ किस्सा
“मी काही इतक्या लवकर जात नाही”, कॅन्सर झाल्यानंतर शरद पवारांनी डॉक्टरांसोबत लावली होती पैज
“पैज लाव…मी काही इतक्या लवकर जात नाही”, शरद पवारांनी सांगितला कॅन्सरबद्दलचा किस्सा
सुप्रीम कोर्टाचा शिवसेनेला धक्का तर शिंदे गटाला दिलासा; १६ आमदारांच्या अपात्रता याचिकेवर दिले ‘हे’ आदेश