आगामी पालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने कसून तयारी केली आहेया निवडणुकीला अजून दोन महिने बाकी आहेत. परंतु, भाजपने आतापासूनच तयारीला सुरुवात केली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता सर्वच पक्ष मैदानात उतरतील अशी शक्यता आहे. (i have come to beg for votes chandrakant patil)
तसेच पुणे महापालिकेची आगामी निवडणूक भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली लढविल्या जातील अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये सध्या पाटील यांनी दौरे सुरू केले आहेत.
काल शेवाळेवाडी येथे आयोजित सभेला संबोधित करताना पाटील यांनी मी तुमच्याकडे पुणे महानगरपालिकेसाठी मतांची भीक मागायला आलोय आणि तुमची मतं बुक करायला आलेलो आहे. अस सांगतच गेल्या पाच वर्षात पुणे महानगरपालिकेमध्ये एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाहीये किंवा तो सिद्धही झालेला नाही असा दावा पाटील यांनी आहे.
तसेच पुढे बोलताना पाटील म्हणाले, “सर्व पक्षांनी एकाच व्यासपीठावर जनतेसमोर यावे आणि पुणे शहराच्या विकासात कोणी किती भर घातली ते सांगावे. गेल्या पन्नास वर्षात त्यांना जे जमले नाही ते व त्याहीपेक्षा जास्त काम आम्ही पाचच वर्षात करून दाखवले आहे.”
दरम्यान, ‘गेल्या पाच वर्षात भाजपकडून एकही रूपयांचा भ्रष्टाचार झाला नाही. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले असले तरी त्यातील एकही आरोप सिद्ध झाला नाही. पुणेकरांसाठी भाजपने मेट्रो आणली. शहरातील रस्ते व्यवस्थीत करण्यात आले आहेत. पाण्याचा प्रश्न सोडवला आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.
‘नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमुळे गावाचं गावपण नष्ट होतं आणि शहरात आलेला नागरिकांचा विकासही होत नाही,मात्र अजित पवारांना वाटत आपली महापालिका मोठी व्हावी कारण नंतर गावातील जमिनी हडप करयला मिळतात अशी टीका ही पाटील यांनी अजित पवारांवर केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘पुणे-मुंबईची भाषा ही महाराष्ट्राची भाषा नाही’, नागराज मंजुळे असं का म्हणाले?
VIDEO: सामना सुरु असतानाच इशान किशनला करावं लागलं रुग्णालयात दाखल; पहा नक्की काय घडलं
काही मराठी कलाकारच स्वतः हिंदीत बोलतात तेव्हा ते ऐकून.., अतुल गोगावलेंनी व्यक्त केली खंत
‘पावनखिंड’ चित्रपटातील ‘रायाजी’ अर्थात अंकित मोहनची बायको आहे ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री