Share

ओबीसी आरक्षणाला धक्का नसून धोका आहे, हे मी आधीच सांगितलं होतं, पंकजा मुंडेंची सरकारवर टीका

ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज एक मोठी सुनावणी पार पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने केलेला नवीन कायदा फेटाळत १५ दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे.

अशातच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना, “मी पूर्वीच असं भाष्य केलं होतं, ओबीसी आरक्षणाला धक्का नसून धोका आहे आणि ते आता सत्यात उतरताना दिसत आहे.” असे पंकजा मुंडे यांनी म्हणले आहे.

तसेच, “सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय या मागची भूमिका महत्वाची आहे. सर्वोच्च न्यायालयात आपण गंभीरपणे ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यात अपयशी ठरलो, असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणासमोरचं प्रश्नचिन्ह हे अजून गूढ होत चाललेलं आहे” असे मुंडे यांनी बोलून दाखवले आहे.

पुढे बोलताना, सर्वोच्च न्यायालायने सांगितलं आहे की निवडणुका जाहीर करा. पण तरीही राज्य सरकार आता काय भूमिका घेणार आहे? या निवडणुका जाहीर करण्यासाठी राज्य सरकाच्या अख्त्यारीत असणारा निर्णय राज्य सरकार घेणार आहे का? असा सवाल पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

यासोबतच, “राज्य सरकार मंत्रीमंडळात एक विशेष निर्णय घेऊन, आम्ही ओबीसी आरक्षणाबरोबरच निवडणुका घेऊ अशी भूमिका घेणार आहे का? याकडे आता माझं लक्ष आहे” असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला, “१५ दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा” असे आदेश दिले आहेत.

त्यामुळे आता ओबीसी आरक्षणाशिवायच स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. न्यायालयाने या निवडणुका २०२० च्या जुन्याच प्रभागरचनेनुसार घेतल्या जाव्यात असेही स्पष्ट सांगितले आहे. यामुळे आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आणि महाआघाडी सरकारमध्ये पुन्हा नवीन वादाला सुरुवात झाली आहे.

महत्वाच्या बातम्या
गौतम अदानींच्या झोळीत आला ‘कोहिनुर ब्रँड’, विदेशी कंपनीकडून घेतले सर्व मालकी हक्क
मला ड्रग्स दिले आणि माझ्यासोबत…, पूजा मिश्राचे शत्रुघ्न सिन्हा यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप
‘मर्सिडीज बेबींना संघर्ष काय कळणार?’, देवेंद्र फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका
महाविकास आघाडी सरकारला दणका, सर्वोच्च न्यायालयाचे १५ दिवसांत निवडणूका जाहीर करण्याचे आदेश

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now