पण मोदींची देहू भेट एका वेगळ्याच कारणामुळे सर्वात जास्त चर्चेत आली आहे. ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाषणाची संधी न देणे. या कार्यक्रमावेळी पंतप्रधानांचे भाषण झाले, पण अजित पवारांना भाषणाची संधी दिली गेली नाही. अजित पवार राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून तिथे उपस्थित झाले होते.
तसेच या कार्यक्रमाला भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सुद्धा उपस्थित होते. त्यांच्यात फडणवीसांनी भाषण केले होते. अजित पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूलाच बसलेले होते. तर दुसऱ्या बाजूला फडणवीस बसलेले होते. यावेळी सर्वात आधी देवेंद्र फडणवीसांनी भाषण केलं.
त्यानंतर सुत्रसंचालकांनी थेट मोदींचे नाव घेतले. त्यामुळे मोदी भाषणाला गेले. अजित पवारांना भाषणाची संधी दिली गेली नसल्यामुळे राजकारणातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि नेते अमोल मिटकरी यांनीही यावर नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान, यावर आता रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत (Sadabhu Khot) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘सुप्रिया सुळे यांनी `तो` शपथविधी आठवावा मग त्यांच्या लक्षात येईल की प्रोटोकॉलप्रमाणे झाले की नाही. प्रोटोकॉलप्रमाणे आधी मुख्यमंत्री बोलतात आणि मग उपमुख्यमंत्री त्यात वावगं काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी आठवा. त्यात फडणवीस मुख्यमंत्री तर पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री म्हणून पाहिले जाते. मग मुख्यमंत्री बोलले तर त्यात वावगं काय?, असा प्रश्न त्यांनी केला. मी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणूनच बघतो, असा टोला खोत यांनी लगावला आहे.
पुण्याच्या ऋतुराजची ‘तुफान’ फटकेबाजी, मारले पाच चेंडूत पाच चौकार; पाहा व्हिडिओ
प्रसिद्ध अभिनेत्रीला १३-१४ वर्षांच्या मुलांनी दिल्या बलात्काराच्या धमक्या, धक्कादायक कारण आले समोर
सामान्य नागरीकाने केली माळशेज घाटातील लुटारू पोलिसांची पोलखोल, व्हिडीओ होतोय व्हायरल
काश्मिरी पंडितांचे खून अन् गाय तस्करीवेळचं माॅब लिंचिंग यात काहीही फरक नाही; साई पल्लवीचे बेधडक वक्तव्य