देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल माध्यमातून समोर यायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या मतदानोत्तर चाचणीचे कल खोटे ठरतील. येत्या १० तारखेला ईव्हीएम मशिन्स उघडतील तेव्हा वेगळे चित्र दिसेल. असे भाकित शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
राऊत यांनी म्हटले आहे की, एक्झिट पोलवर जाऊ नका. यापूर्वीही याचा फज्जा उडाल्याचा बघितलं आहे. १० तारखेला प्रत्यक्ष मतपेटीतून काय बाहेर येतं त्यावर मत व्यक्त करुयात. या देशातील अनेक राज्यांमध्ये प्रस्थापितांविरुद्ध राग आहे आणि तो मतपेटीतून स्पष्ट दिसेल. एक्झिट पोल खोटे सिद्ध होतील असा मला विश्वास आहे.
२५ आमदारांच्या नाराजीबाबत बोलताना राऊत म्हणाले, शिवसेनेच्या आमदारांनी पाठवलेल्या पत्रासंदर्भात पक्षात चर्चा झाली आहे. २५ किंवा त्यापेक्षा जास्त आमदार निधीवाटपाच्या मुद्द्यावरून नाराज आहेत. निधी वाटपातील असंतोषाविषयी हे पत्र आहे. आमदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असतील तर यामध्ये काहीही गैर नाही. राज्यातील प्रत्येक आमदाराचा निधीवर हक्क आहे.
समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार, विधानसभेत भाजप 403 जागांपैकी 240 जागांवर विजय मिळवेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर यावर्षी पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची सत्ता येणार असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसच्या हाती यावेळेस बहुतेक अपयश येईल असे एक्झिट पोलमध्ये स्पष्ट झाले आहे.
गोव्यात तर निवडणूक अतिशय चुरशीची झाली असून भाजपा आणि काँग्रेसला 16 च्या आसपासच जागा दिल्याचे दिसत आहे. 40 सदस्यांच्या विधानसभा बहुमतासाठी 21 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे कोणते भाकित खरे ठरेल यावर फक्त चर्चा करण्यात येत आहे.
दुसऱ्या बाजूला देशबंधूंने दिलेल्या एक्झिट पोलनुसार, उत्तराखंडमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेवर येणार आहे. उत्तराखंड विधानसभेत काँग्रेसला ४० ते ४६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्याचवेळी भाजपला २२ ते २८ जागा मिळण्याची शक्यता या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आली आहे.
उत्तराखंडमध्ये आप आणि इतर पक्षांना २ ते ३ जागा मिळू शकतात, असा अंदाज देशबंधूंच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वजन निकालाची आतूरतेने वाट पाहत आहेत.
महत्वाच्या बातम्या
धक्कादायक! पुण्यात रिक्षाचालकाने केला घात, दोन विद्यार्थ्यांना मंगळवार पेठेत नेऊन…
‘माझे शब्द लक्षात ठेवा, ईडीचे काही अधिकारी जेलमध्ये जाणार आहेत’, राऊतांच्या दाव्याने उडाली खळबळ
Russia Ukraine war: मोदींचा तो फोटो पुन्हा होतोय व्हायरल, पुतिन यांच्यामागे हात बांधून उभे आहेत मोदी
मला जे सांगायचे होते ते मी.., झुंडच्या वादावर नागराज मंजुळेंनी पहिल्यांदाच दिले स्पष्टीकरण