शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. सध्या सर्व आमदार आसामच्या गुवाहटीमध्ये आहेत.
तर अलीकडे शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam ) he देखील नाराज असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये आल्या होत्या. यावर आज माध्यमांशी बोलताना कदम यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ‘मी मरेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही,’ असं रामदास कदमांनी स्पष्टच सांगितलं आहे.
यावेळी बोलताना कदम यांनी म्हंटलं आहे की, “मी कधीही पक्षाशी कधीही बेईमानी करणार नाही, मी मरेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही, मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच राहणार आहे, मी कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही,’ असं रामदास कदम यांनी यावेळी बोलताना म्हंटलं आहे.
दरम्यान, ‘मुलांना मतदारसंघात त्रास दिला जातो हे खरं आहे. मात्र मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मुलांना जिथे जायचे तिथे जाऊ दे, मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच असणार आहे,’ असं कदम यांनी म्हंटलं आहे. यामुळे आता कदम नाराज असल्याच्या चर्चाना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
तर दुसरीकडे राज्यभरात एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडखोरीचे पडसाद उमटत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाराज असलेले शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास ५० हून अधिक आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
तसेच शिंदे गटासोबत जाणाऱ्या आमदारांची संख्याही वाढताना दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्यास केंद्रीय यंत्रणांकडून होणाऱ्या कारवाया बंद होतील, असा त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी ही बंडखोरी केल्याचे म्हटले जात आहे. पण या बंडखोरीमुळे शिवसैनिक तापले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
“शिंदेसाहेब तुम्ही निष्ठावान शिवसैनिकासारखे वागला नाहीत, मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही”
महाराष्ट्रातील सत्तेचा पेच सोडवण्यासाठी आता राज्यपाल मैदानात उतरणार
शिवसेनेसाठी राष्ट्रवादी रणांगणात उतरली; आमदार थांबलेल्या गुवाहाटीतील हाॅटेलबाहेर..
‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने दिला एकनाथ शिंदेंना पाठिंबा; म्हणाले, ते माझ्या सख्ख्या भावासारखे…