सध्या अभिनेत्री केतकी चितळे चांगलीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत फेबसूकवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. अनेकांनी तिला कडाडून विरोध केला आहे.
केतकी चितळेच्या पोस्टवर अनेकांनी संतापही व्यक्त केला आहे. राजकीय वर्तुळातही या प्रकरणावरून वातावरण तापलेले आहे. अनेक नेत्यांनी तिच्या पोस्टला विरोध केला आहे. असे असताना केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.
काल केतकी चितळेला कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी कोर्टाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. विशेष बाब म्हणजे कोर्टात केतकीने वकील घेतला नाही, तिनं स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. यावेळी ‘माझी पोस्ट डिलिट करणार नाही,’ असं पुन्हा केतकीने कोर्टात ठामपणे सांगितलं.
तर आता रयत क्रांती संघटनेनं केतकीला समर्थन दिले आहे. सदाभाऊ खोत यांनी केतकीला समर्थन देताना ठाकरे सरकारला खडेबोल सुनावले आहे. “केतकी कणखर आहे. तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही. तिला मानावं लागेल,’ असं त्यांनी म्हंटलं आहे.
खोत यांच्या या विधानाने नक्कीच आता नव्या वादाला तोंड फुटणार असल्याच बोललं जातं आहे. याबाबत पुढे बोलताना खोत म्हणाले, ‘मला केतकीचा अभिमान आहे. न्यायालयात तिने स्वत:ची बाजू मांडली. तुम्ही केलं तर पाटलांच्या पोरानं केलं आणि इतरांनी केलं तर कुणब्याच्या पोरानं केलं. आता हे धंदे बंद करा.’
पुढे बोलताना सदाभाऊ म्हणाले, ‘राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याबाबत वेगळा शब्द वापरुन टीका केली होती. त्यावेळी तुमची नैतिकता कुठे होती? असा सवाल उपस्थित करत अमोल मिटकरी ब्राह्मण समाजाला टार्गेट करतात त्यावेळी तुमच्या जिभेला हाड नव्हतं का? स्वत:वर टीका केली की सगळं आठवतं” असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारला घेरले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण झाले पुर्ण; मशिद परिसरातील विहिरीत सापडले शिवलिंग
PUBG खेळताना तरूणीने दोघांसोबत खेळला प्रेमाचा गेम; भेटायला बोलावलं अन् घडलं भयानक…
लालपरीने पुन्हा सिध्द करून दाखलं! दीड महिन्यात केली ‘इतक्या’ कोटींची कमाई; आकडा वाचून चकीत व्हाल
‘धर्मवीर’ चित्रपटातील ‘तो’ सीन सुरू होताच मुख्यमंत्र्यांनी चित्रपटगृह सोडलं; जाणून घ्या यामागील कारण…