ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. अब्दुल सत्तार हे पहिल्यापासून शिंदे यांच्या सोबत होते. शिंदे यांनी बंड पुकारल्यापासून सत्तार हे शिंदे यांच्यासोबत होते. 10 दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर राज्यात शिंदेशाही पर्वास सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर बहुमत चाचणीच्या आदल्या दिवशी सगळे बंडखोर नेते हे मुंबईत आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटी येथे गेलेले बंडखोर आमदार सरकार स्थापन झाल्यानंतर प्रतिक्रिया देत आहेत.
याच पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मी शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हावरच निवडून आलो. शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आल्यानंतर मी काय एमआयएमचा आमदार आहे का? असा संतप्त सवाल अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
पुढे बोलताना अब्दुल सत्तार यांनी म्हंटलं आहे की, ‘मी हिंदुत्त्ववादी पार्टीचाच आमदार आहे. युतीसाठी हिंदुत्त्ववादी पार्टीसोबत गेलो, तर त्यात काही चूक नाही,” असा प्रतीसवाल सत्तार यांनी केला आहे. याचबरोबर आगामी सर्व निवडणुकांमध्ये हे शिंदे – भाजप सरकार जिंकेल, असा दावाहि त्यांनी केला आहे.
याबाबत बोलताना अब्दुल सत्तार यांनी म्हंटलं आहे की, “आगामी काळात दोन्ही पक्षांचे मिळून २०० जागांवर आम्ही जिंकू असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मला विश्वास आहे की, शिवसेना आणि भाजपा युती २०० जागा जिंकेल,” असा विश्वास अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे.