कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरमधले राजकीय वातवारण चांगलेच तापले आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच निधन झाले. त्यामुळे कोल्हापूर उत्तरची जागा ही गेल्या वर्षभरापासून रिक्त आहे. आता या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे.
तसेच राज्य निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लगेच राजेश क्षीरसागर यांनी निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याचा निर्धार केला होता. पण शिवसेनेच्या वरिष्ठांनी कोल्हापूर उत्तरची जागा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसससाठी सोडली. त्यामुळे राजेश क्षीरसागर नाराज झाले होते.
गेल्या दोन दिवसांपासून ते नॉट रिचेबल होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ माजली होती. राजेश क्षीरसागर बंड करणार का? अशी धाकधूक काँग्रेसला लागली होती, ती आता संपली आहे. क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांना आदेशाप्रमाणे काम करत संयम ठेवण्याचं आवाहन केलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, मी कडवा शिवसैनिक आहे. ठाकरे कुटुंबाचा निष्ठावंत आहे. यामुळे त्यांनी टाकलेला शब्द खाली पडू देणार नाही. शिवसैनिकच काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांना निवडून आणतील, अशी ग्वाही क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यासमोर बोलताना दिली.
रविवारी ते याबाबत बोलत होते. दरम्यान या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून या ठिकाणी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी देण्यात आली असल्याची अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
या निवडणुकीत शिवशक्ती सेनेच्या प्रमुख करुणा शर्मा यांनी देखील उडी घेतली आहे. ‘मी लय पावरबाज.. मुंडेपेक्षा राज्यात माझी जास्त ओळख असून मला राज्यातील १३ कोटी जनतेचे नेतृत्व करायचे असून त्याची सुरुवात कोल्हापूर मधून केली आहे, असे म्हणत त्यांनी विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘मला मंत्री केलं असतं तर..’ दोन दिवस नॉटरिचेबल असलेल्या आमदाराने बोलून दाखवली मनातली खंत
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींवर मोठी कारवाई; बुलडोझरने उद्ध्वस्त केली घरं
होळी खेळून घरी येताना प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, चाहत्यांवर कोसळला दुखाचा डोंगर
आळंदीच्या तरूणाला हायटेन्शन टॉवरवर चढलेलं पाहून पोलिसांना आले टेन्शन, तब्बल ९ तास चालली नौटंकी