Share

रंग खेळून घरी आल्यावर नवरा-बायको एकत्रच गेले अंघोळीला, २ तासांनी आढळले ‘या’ भयानक अवस्थेत

सध्या सगळीकडे होळीचा सण असल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. असे असताना या आनंदाच्या वातावरणात काही धक्कादायक घटनाही समोर येत आहे. आता हरियाणाच्या कारनलमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. (husband wife dead after playing holi)

कारनलमध्ये धुलिवंदन खेळून आलेले एक दाम्पत्य अंघोळीसाठी गेले होते. असे असतानाचा बाथरुममध्ये त्यांचा अपघात झाला आणि तिथेच त्यांचा मृत्यु झाला आहे. त्यांचा हा अपघात गिझरमुळे झाला आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, संबंधित घटना ही घारौंडा येथे घडली असून हे दाम्पत्य प्रसिद्ध व्यवसायिकाचा मुलगा आणि सून होते.

असे सांगितले जात आहे की, होळी खेळल्यानंतर हे जोडपे अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले होते. त्यानंतर बराच वेळ ते बाहेर न आल्याने घरातील सदस्यांना चिंता वाटू लागली. त्यावेळी त्यांनी बाथरुम उघडले असता दोघेही तेथे मृतावस्थेत पडले होते. गिझरचा गॅस वाढल्याने त्यांचा मृत्यु झाल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले.

मिळालेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय गौरव पत्नी शिल्पीसोबत होळी साजरी करून घरी परतला होता. होळीच्या दिवशी रंग उतरवण्यासाठी दोघे दाम्पत्य अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले. यादरम्यान बाथरूममधील गिझरमधून गॅस गळती झाल्याने दोघेही तेथेच बेशुद्ध झाले. तसेच वेळेत ऑक्सिजन न मिळाल्यामुळे त्यांचा तिथेच मृत्यु झाला.

बाथरुममध्ये गौरव आणि शिल्पीसोबत घडलेल्या घटनेची कुटुंबीयांना कल्पनाही आली नाही. सुमारे २ तासानंतर गौरवच्या कुटुंबीयांनी बाथरूम उघडून त्यांना पाहिले असता त्यांची तारांबळ उडाली. पती-पत्नीला त्याच अवस्थेत रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेनंतर कुटुंबीयांच्या आनंदावर शोककळा पसरली.

२७ वर्षीय गौरव आणि २५ वर्षीय शिल्पी यांचा तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. होळीनिमित्त गौरव हा पत्नीसह सासरच्या घरी गेला होता, तेथे होळी साजरी करून दोघेही दुपारी घरी परतले. यानंतर होळीचा रंग उतरवण्यासाठी ते अंघोळीसाठी गेले होते. पती-पत्नीच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.

दरम्यान, तिकडे मुंबईमध्ये देखील अशीच एक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.  पाण्याच्या फुग्यामुळे विरार पश्चिम भागात एका सायकलस्वाराला आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे विरारमध्ये होळीच्या सणाला देखील गालबोल लागलं आहे. मृत पावलेल्या सायकलस्वाराचं नाव रामचंद्र पटेल असं आहे.

तर दुसरीकडे राज्य सरकारने होळीचा सण साजरा करताना पाण्याचे फुगे मारण्यास बंदी केली आहे. परंतू अजुनही काही मंडळी धुळवडीदरम्यान सर्रास फुगे मारताना दिसतात. यामध्ये अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. हा सण आनंदाचा, आयुष्यात रंग भरण्याचा असला तरीही अशा घटनांमुळे एखाद्याच्या घरी दुःखाचं वातावरण तयार होतं.

देशभरात होळी-रंगपंचमीची (Holi 2022)  धूम पाहायला मिळाली.  प्रत्येक जण रंगामध्ये स्वतःला रंगवून घेतो आहे. परंतू अनेकदा होळीचा सण साजरा करताना काही जण भान हरपतात, अशामुळे काहींना प्राण गमवावे लागतात.

महत्वाच्या बातम्या-
कोल्हापूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; शिवसेनेचे राजेश क्षीरसागर झाले ‘नॉट रिचेबल’
तीन कोब्रांना एकाचवेळी हाताळत होता तरुण अन्…; पहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
भयानक! हँडसम दिसण्यामुळे तरुणाचा गेला जीव, ८०० किलोमीटवरुन बाईकवरुन आला आरोपी अन् घेतला जीव

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now